Live-In Partner Rape: लिव्ह-इन पार्टनरच्या मुलीवर वर्षभर बलात्कार; नागपूर येथून पुरुष जोडीदारास अटक

नागपूर पोलिसांनी एका 37 वर्षीय इसमास रविवारी (23 जानेवारी) अटक केली आहे. त्याच्यावर लिव्ह इन पार्टनरच्या (Live-In Partner ) 12 वर्षीय मुलीवर पाठिमागील एक वर्षापासून बलात्कार (Rape In Nagpur City) करत असल्याचा आरोप आहे.

Rape | (Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

Live-In Partner Rape: महाराष्ट्राची उपराजधानी दिल्ली येथून धक्कादायक वृत्त पुढे येत आहे. नागपूर पोलिसांनी एका 37 वर्षीय इसमास रविवारी (23 जानेवारी) अटक केली आहे. त्याच्यावर लिव्ह इन पार्टनरच्या (Live-In Partner ) 12 वर्षीय मुलीवर पाठिमागील एक वर्षापासून बलात्कार (Rape In Nagpur City) करत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागपूर शहरातील वाठोदा (Wathoda) येथील रहिवासी आहे.

नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनमधील एका अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, आरपी हा ऑक्टोबर 2022 पासून एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होता. सदर महिलेचा आगोदर विवाह झाला होता. तसेच, पहिल्या पतीकडून तिला एक मुलगीही होती. ही मुलगी या महिलेसोबत राहात होती. तिच्यावरच आरोपीने बलात्कार केला. लिव्ह इन पार्टनरशिपमध्ये राहणारी महिला जेव्हा काही कामानिमित्त घराबाहेर पडत असे तेव्हा आरोपी तिच्या मुलीचे (पीडिता) लैंगिक शोषण आणि तिच्यावर बलात्कार करत असे. (हेही वाचा, Mumbai Crime: धक्कादायक! मुख्यध्यापकांकडून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार, मुंबई पोलिसांकडून तपास सुरु)

पाठिमागील एक वर्षभरापासून आरोपी पीडितेसोबत हे कृत्य करत होता. तसेच, पीडितेने तिची आई अथवा इतर कोणाला घडल्या प्रकाराची माहिती दिली, जीवे मारीन, अशी तो तिला सातत्याने धमकी देत होता. सततचे धमकावणे आणि छळ यामुळे पीडितेने तिच्यासोबत घडणाऱ्या प्रकाराची कुठेच वाच्यता केली नाही, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, सततच्या छळाला कंटाळून पीडितेने घडला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसांत जाऊन तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता (IPC) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत बलात्कार आणि गुन्हेगारी धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.