Ranjitsinh Disale: अब्दुल कलाम 'प्राइड ऑफ इंडिया' पुरस्कारासाठी रणजितसिंह डिसले गुरुजी यांची निवड
महाराष्ट्रातील जागतिक शिक्षक पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disley) यांची डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार 2022 (Dr. APJ Abdul Kalam Pride of India Award 2022) साठी निवड करण्यात आली आहे. डिसले यांनी ट्विटरवर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचे पत्र शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील जागतिक शिक्षक पुरस्कार प्राप्त रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disley) यांची डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया पुरस्कार 2022 (Dr. APJ Abdul Kalam Pride of India Award 2022) साठी निवड करण्यात आली आहे. डिसले यांनी ट्विटरवर एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचे पत्र शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. डिसले यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या पत्रानुसार, त्यांना 27 जुलै रोजी तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. डिसले यांनी अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक पदाचा नुकताच राजीनामा दिला आहे.
मुलांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी तसेच भारतात क्विक-रिस्पॉन्स (QR) कोडेड पाठ्यपुस्तक क्रांती घडवून आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी त्यांना यूएसडी 1 दशलक्ष जागतिक शिक्षक पुरस्कार 2020 (USD 1 million Global Teacher Prize 2020) देऊन सन्मानित करण्यात आल आहे.
ट्विट
डिसले गुरुजी यांनी ट्विटरवरुन भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, खरं तर ज्यांनी आमच्या पिढीला मोठी स्वप्न पहायला शिकवलं असे आदरणीय डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होतोय. या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढवली हे मात्र निश्चित .
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)