Ramdas Kadam Controversial Statement: अब्दुल सत्तार यांच्यानंतर रामदास कदम घसरले; पत्रकार परिषदेत थेट शिवीगाळ (पाहा व्हिडिओ)
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल काढलेल्या अपशब्दांनंतर आता रामदास कदम (Ramdas Kadam) यांची जीभ घसरली आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार आणि नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच सुरु केली आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल काढलेल्या अपशब्दांनंतर आता रामदास कदम (Ramdas Kadam) यांची जीभ घसरली आहे. आमदार योगेश कदम यांचे पिताश्री असलेल्या रामदास कदम यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुखांवर आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब, सुभाष देसाई आणि इतर काही नेत्यांवर जोरदार टीका केली. ही टीका करताना कदम यांची जीभ कमालीची घसरली. त्यांनी थेट पत्रकार परिषदेतच शिवीगाळ सुरु केली.
अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद अद्यापही कायम आहे. या वादावरुन चर्चा सुरु असतानाच रामदास कदम यांनीही वक्तव्य करुन वादाची राळ उडवून दिली आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि अनिल परब, सुभाष देसाई यांच्यावर टीका करताना रामदास कदम यांची जीभ इतकी घसरली की, त्यांनी अर्वाच्च भाषेतच बोलणे सुरु केले. अनिल परब यांनी माला आणि माझा मुलगा योगेश कमद याला प्रचंड त्रास दिला. ज्या महापालिका शिवसेनेच्या ताब्यात होत्या. त्या महापालिका अनिल परब याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्याब्यात दिल्या. शिवसेना संपविण्याची त्यांनी सुपारीच घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनाही असेच XXX लोक लागतात, असे कदम यांनी म्हटले. (हेही वाचा, Abdul Sattar Controversial Statement: अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यावरुन वाढता दबाव, विरोधक आक्रमक, CM एकनाथ शिंदे, DCM देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आव्हान)
व्हिडिओ
सुभाष देसाई यांच्यावर टीका करताना पुढे रामदास कदम म्हणाले, देसाई हे तर उद्धव ठाकरे यांचे कान चावतात. त्यांचे कान ते सातत्याने भरत असतात,असेही कदम म्हणाले. शिंदे गटातील आमदारांवर खोक्यांचा आरोप होतो. होय, एकनाथ शिंदे खोके देतात. पण ते खोके जनतेच्या विकासासाठी असतात. गुवाहाटीला गेलेले सर्व आमदार मी परत आणत होतो. परंतू, एकच म्हणने होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडून भाजपसोबत परत या. असे असतानाही त्यांनी ऐकले नाही. त्यामुळे हे आमदार परत येऊ शकले नाही, असे रामदास कदम या वेळी म्हणाले.