Ramdas Athawale: मनात होते पण राऊन गेले; रामदास आठवले यांची इच्छा अपूर्ण

मात्र, महायुतीच्या जागावाटपात त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळू खकली नाही. या जागावाटपाबद्दल बोलताना आठवले यांनी म्हटले आहे की, त्यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून (Shirdi Lok Sabha Constituency) निवडणूक लढवायची होती, परंतु युतीच्या काही मजबुरीमुळे हे शक्य झाले नाही.

Ramdas Athawale | (Photo Credit: ANI/X)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी एनडीएमध्ये झालेल्या जागावाटपाबद्दल काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. आठवल यांना त्यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) लढवायची होती. त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लोकसभा मतदारसंघही निवडून ठेवला होता. मात्र, महायुतीच्या जागावाटपात त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळू खकली नाही. या जागावाटपाबद्दल बोलताना आठवले यांनी म्हटले आहे की, त्यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून (Shirdi Lok Sabha Constituency) निवडणूक लढवायची होती, परंतु युतीच्या काही मजबुरीमुळे हे शक्य झाले नाही. त्यामुळे 'मनात होते पण राऊन गेले' अशी भावना आठवले यांचे कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

नागपूर येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले यांनी म्हटले की,त्यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. परंतू, ते शक्य झाले नाही. पक्षाला जागा मिळाली नाही. त्यामुळे नाराजी असली तरी, त्यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) कार्यकर्त्यांनी त्यांना सत्ताधारी एनडीएमध्ये राहण्यास सांगितले आहे. तसेच, केंद्रातील मंत्रीपद एनडीए सत्तेत आल्यानंतर कायम असावे, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचेही आठवले यांनी म्हटले आहे.

रामदास आठवले सध्या केंद्रात मंत्री असले तरी ते राज्यसभा सदस्य आहेत. मात्र, आगामी काळात आपण लोकसभा सभागृहात जनतेतून निवडून जावे. त्यासाठी शर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा रामदास आठवले आणि त्यांच्या पक्षाचा विचार होता. शिवसेने विद्यमान महानेता असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या ऐवजी शिर्डीची जागा देण्याचे आश्वासन दिले होते, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, त्या चर्चेला पुढे काहीच दुजोरा मिळू शकला नाही. (हेही वाचा, Ramdas Athawale: रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षासाठी भाजपकेड दोन जागांची मागणी)

आठवले म्हणाले की, देशभरातील आरपीआय (ए) कार्यकर्त्यांनी त्यांना एनडीएसोबत राहण्यास सांगितले आहे आणि मंत्रिमंडळात जागा मागितली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा केल्याचे ते म्हणाले. दरम्यान, सरकार राज्यघटना बदलणार असल्याच्या अफवा काँग्रेस पसरवत असल्याचेही आठवले म्हणाले. लोकांनी अशा अफवांकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. भाजपकडून संविधान बदलण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असा दावा काँग्रेसडून केला जात आहे. त्याबाबत विचारले असता आठवले यांनी काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला आणि संविधान बदलण्याचा काही प्रयत्न झाल्यास राजीनामा देऊ असे सांगितले. रामदास आठवले हे आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात.