Ramdas Athawale on Sanjay Raut: दलित अत्याचारांच्या विरुद्ध मूग गिळून बसणाऱ्या संजय राऊत यांनी आम्हाला त्यांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्यास शिकवू नये- रामदास आठवले

Ramdas Athawale (Photo Credits: Facebook)

हाथरस  प्रकरणी (Hathras Case) सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. तसेच आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून उत्तर प्रदेशातील सरकारवर टिका केली होती. त्याचसोबत राऊत यांनी नंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले  (Ramdas Athawale) यांनी सुद्धा टिका केली होती. त्यावेळी राऊत यांनी असे म्हटले होते की, हाथरस प्रकरण घडले त्यावेळी आठवले हे नटींच्या घोटळ्यात होते. यावर आता रामदास आठवले यांनी संजय राऊत यांच्या या टिकेला प्रतिउत्तर दिले आहे.

रामदास आठवले यांनी असे म्हटले आहे की, संजय राऊत यांनी आजवर दलित अत्याचाराविरुद्ध एक शब्द सुद्धा काढला नाही. ऐवढेच नाही त्यांच्यासाठी काही करण्यासाठी पुढे सरसावले ही नाहीत. परंतु दलितांसोबत जो काही होणारा अन्याय त्याला न्याय मिळवून देण्यासाठी तेथवर गेलो आहे. त्यामुळे आता दलित अत्याचारांच्या प्रश्नावर नेहमीच मूग गिळून बसणाऱ्या संजय राऊत यांनी त्यांच्या अत्याचाराच्या विरुद्ध लढण्यास शिकवून नये असा निशाणा त्यांच्यावर आठवले यांनी साधला आहे. तसेच पुढे त्यांनी असे ही म्हटले की, नटींच्या घोळक्यात संजय राऊत असतात की नाही ते माहिती नाही. पण मी मात्र कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असल्याचा टोमणा सुद्धा राऊत यांना लगावला आहे. (Hathras Case: 'बेटी बचाओ' चा नारा देणारे नरेंद्र मोदी हाथरस प्रकरणी मूग गिळून गप्प का? बाळासाहेब थोरात यांचा पंतप्रधानांना सवाल)

दरम्यान, हाथरस प्रकरणी रामदास आठवले यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेत आरोपींना कठोर शिक्षा करावी असे म्हटले आहे. तसेच आठवले यांनी पीडितेच्या परिवाराची भेट सुद्धा घेत त्यांच्याशी बातचीत केल्याचे दिसून आले होते. त्याचसोबत हाथरस मधील दलित कुटुंबातील मुलीसोबत घडलेला प्रकार हा अत्यंत क्रुर आणि निंदनीय आहे. त्यामुळे देशातील पक्षाचे कार्यकर्ते यांनी संताप व्यक्त बहुतांश ठिकाणी आरपीआयकडून या घटनेच्या विरोधात आंदोलन सुद्धा केल्याचे म्हटले होते.