IPL Auction 2025 Live

Maharashtra Assembly Elections: रामदास आठवले यांची युतीमध्ये 10 जागांसाठी मागणी; शिवसेना-भाजपा 240 जागा जिंकणार असल्याचा व्यक्त केला विश्वास

आपण शिवसेना भाजपा युतीसोबत राहणार आणि राज्यात विधानसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवणार असा विश्वासदेखील व्यक्त केला आहे.

Ramdas Athawale | (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्रामध्ये लवकरच आगामी विधानसभा निवडणूक 2019 साठी तारखा होणार आहे. या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आता सारेच पक्ष कामाला लागले आहेत. राज्यात भाजपा-शिवसेना पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात आयाराम पक्षप्रवेश करत आहेत. अद्याप शिवसेना - भाजपा या युतीने जागावाटप अथवा युतीची घोषणा केलेली नाही, मात्र युतीमधील एक महत्त्वाचा मित्रपक्ष म्हणजे आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनी 10 जागांची मागणी केली आहे. आपण शिवसेना भाजपा युतीसोबत राहणार आणि राज्यात विधानसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवणार असा विश्वासदेखील व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात 288 जागांसाठी विधानसभा निवडणूक रंगणार आहे. यासाठी इच्छुकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत तयारी देखील सुरू केली आहे.आता लोकसभेप्रमाणेच आरपीआय पक्ष महाराष्ट्रात तयारीला लागलं आहे. आरपीआयने युतीमध्ये 10 जागांची मागणी केली आहे. तसेच 288 जागांपैकी सुमारे 240 जागांवर शिवसेना- भाजपा युतीचा विजय होणार असल्याचे भाकीतही रामदास आठवले यांनी वर्तवलं आहे. मीडियारिपोर्टनुसार 19 सष्टेंबरला शिवसेना- भाजपा युतीची घोषणा करू शकतात. तसेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महत्त्वाच्या घोषणा करण्याकडे कल असतो. त्यानुसार आता येत्या काही दिवसात निवडणूक तारखा जाहीर होतील. यासोबतच ज्या दिवशी तारीख होईल तेव्हापासूनच आचारसंहिता लागू होइल.

ANI Tweet

राज्यामध्ये युती फिफ्टी-फिफ्टीचा फॉर्म्युला आजमवणार की भाजपा देखील ती ऑफ़र शिवसेना स्वीकारणार हे पाहणं आता उत्सुकतेच ठरणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात आयाराम युतीमध्ये प्रवेश करत असल्याने शिवसेना आणि भाजपाचे जुने कार्यकर्ते नाराज होणार का? सार्‍यांचे मन जपत तिकीट वाटप कसे केले जाणार? हे आता पहावे लागणार आहे.