Ramadan 2019 Iftar Time 10 May: मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद शहरामध्ये आजचा रमजान रोजा सोडण्यासाठी 'इफ्तार' वेळ काय?
मुस्लिम बांधव दिवसभर निर्जळी उपवास करतात. या उपवासाचा शेवट संध्याकाळी इफ्तारच्या (Iftar Time) वेळेस केला जातो. तर पहाटे सेहरीच्या वेळेपर्यंत (Sehri Time) तुम्ही मेजवानीवर ताव मारू शकता.
Ramzan 2019 Todays Iftar & Sehri Time: यंदाच्या रमजान महिन्याला (Ramadan Month) सुरूवात झाली आहे. मुस्लीम बांधवांसाठी पवित्र असणार्या या महिन्यात रमजान रोजाला (Roja) विशेष महत्त्व असतं. या महिन्यात मुस्लिम बांधव दिवसभर निर्जळी उपवास करतात. या उपवासाचा शेवट संध्याकाळी इफ्तारच्या (Iftar Time) वेळेस केला जातो. तर पहाटे सेहरीच्या वेळेपर्यंत (Sehri Time) तुम्ही मेजवानीवर ताव मारू शकता. जर तुम्ही काम, ऑफिसचं वेळापत्रक सांभाळून रमजानचे रोजे ठेवत असाल तर पहा मुंबई, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद शहरामध्ये आज 10 मेच्या इफ्तारची वेळ पहा. Ramadan 2019 Iftar & Sehri Timetable: 'इफ्तार' आणि 'सेहरी' ची मुंबई, औरंगाबाद, नाशिक आणि पुणे शहरातील वेळापत्रक PDF स्वरूपात पहा आणि डाऊनलोड करा
10 मे इफ्तार आणि 11 मे सेहरीची वेळ काय?
आज 10 मे दिवशी मुंबईमध्ये इफ्तारची वेळ संध्याकाळी 7.05 मिनिटांची आहे. दुसर्या दिवशी सकाळी 4.46च्या सेहरीच्या वेळेपर्यंत मेजवानीचा आनंद घेता येणार आहे.तर पुण्यामध्ये आज संध्याकाळी 7.00 वाजण्याची इफ्तारची वेळ आहे तर सकाळी 4.43 ही सेहरीची वेळ आहे. नाशिकमध्ये आज संध्याकाळी 7.03 ही इफ्तारची वेळ आहे आणि सेहरी सकाळी 4.40 पर्यंत आहे. तर औरंगाबादमध्ये संध्याकाळी 6.56 ची इफ्तारची वेळ आहे आणि सेहरी 4.34 ची आहे. त्यामुळे रोजा ठेवणारी व्यक्ती स्वतःचं आरोग्य जपण्यासाठी, डीहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून संध्याकाळी इफ्तारच्या वेळेपासून पहाटे सेहरीच्या वेळेपर्यंत आवडीचे पदार्थ खाण्याची मुभा आहे. Ramadan 2019 Iftar Special Food: मुंबई मधील मोहम्मद अली रोडवर 'इफ्तार' स्पेशल मेजवानीचा आनंद घेणार असाल तर हे 5 पदार्थ एकदा चाखायला हवेच!
रोजा ठेवणारी व्यक्ती इफ्तारच्या वेळेस खजूर आणि पाणी यांचे सेवन करून दिवसभराचा उपवास सोडते. 7 मे ते 4 जून 2019 च्या काळात यंदा रमजान महिना आहे. मुस्लिम बांधवांसाठी हा महिना अत्यंत पवित्र असतो.
(The above story first appeared on LatestLY on May 10, 2019 05:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

