Ram Mandir Bhoomi Pujan: राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार- संजय राऊत

संजय राऊत यांनी एक प्रतिक्रिया व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही, असा टोला भाजपला लगावला होता.

CM Uddhav Thackeray | (Photo Credit: Twitter)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) अयोध्या (Ayodhya ) येथे राम मंदिर भूमिपुजन (Ram Mandir Bhoomi Pujan) कार्यक्रमासाठी जाणार आहेत, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. राम मंदिर आणि अयोध्या यांविषयी शिवसेनेचे वेगळे आणि भावनिक नाते आहे. शिवसेनेने आपले योगदान, बलिदान राम मंदिरासाठी दिले आहे. त्यामुळे अयोध्येला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) अनेकदा गेले आहेत, असेही ते म्हणाले. 5 ऑगस्ट या दिवशी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे.

शिवसेनेला अयोध्या भूमिपूजनाचे निमंत्रण आले आहे काय? असे विचारले असता निमंत्रण येईल असे संजय राऊत म्हणाले. पुढे बोलताना राऊत यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस संकटाच्या काळात अयोध्या राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होईल असे वाटत नाही. पंतप्रधान आणि काही महत्त्वाच्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडू शकेल असेही राऊत यांनी सांगितले. (हेही वाचा, Ram Mandir Bhumi Pujan: राम जन्मभूमी अयोध्येचा रस्ता शिवसेना पक्षानेच तयार केला; शिवसेना खासदार संजय राऊत यांचा दावा)

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आणखी कोण आयोध्येला जाणार का? याबाबत अद्याप काही माहिती नाही. लवकरच तीही माहिती पुढे येईल, असेही राऊत यांनी सांगितले. संजय राऊत यांनी एक प्रतिक्रिया व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांना अयोध्येला जाण्यासाठी निमंत्रणाची गरज नाही, असा टोला भाजपला लगावला होता.