Raju Patil On Anurag Thakur: मनसेचे एकुलते एक आमदार राजू पाटलांचा थेट केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांना खोचक टोला

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांना खोचक टोला लगावला आहे.

केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकुर (Sports Minister Anurag Thakur) सध्या कल्याण डोंबिवली दौऱ्यावर आहेत. काल विविध स्थळांना भेटी देत संबंधीत परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांसह व्यापाऱ्यांची देखील बैठक घेतली. त्यानंतर तब्बल चार तासांच्या जम्बो (Jumbo) बैठकी दरम्यान ज्याप्रकारे लोकप्रतिनिधींनी या बैठकीत आपले मत मांडले आहे, त्यानुसार व्यवस्थेत आणि कामकाजाच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे," असे मत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी व्यक्त केले. तसेच कल्याण डोंबिवली परिसरातील रस्त्यांच्या (Kalyan Dombivli Roads) दुरावस्थेबाबत अनुराग ठाकुर यांनी नाराजी व्यक्त केली. तरी यावर ट्वीट करत मनसेचे आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांना खोचक टोला लगावला आहे.

 

आमदार राजू पाटील यांनी ट्वीट (Tweet) केलं आहे, कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC Mahapalika) फक्त सेटींगमध्ये (Setting) स्मार्ट (Smart)  आहे. मग ती टक्केवारीची असो की नवनवीन पुरस्कार असो. बरं झाले अनुराग ठाकुरजी (Anurag Thakur) आपणच घरचा आहेर दिला, अशी प्रतिक्रीया देत राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. लवकरच राज्यात विविध महापालिका निवडणुका (Election) पार पडणार आहे. मुंबईसह उपनगर महापालिकेवर सत्ता मिळवणं भाजपसाठी (BJP) महत्वाचं आहे त्याचं दृष्टीकोणातून भाजपकडून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur) यांच्यावर कल्याण डोंबिवली महापालिकेची जबाबबदारी सोपवण्यात आली अशी चर्चा आहे. (हे ही वाचा:- Mumbai-Maharashtra Rain Update: राज्यभरात पुन्हा मुसळधार तर मुंबईसह उपनगरात दमदार पावसाची हजेरी)

 

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Sports Minister Anurag Thakur) कालपासून कल्याण (Kalyan) लोकसभा मतदारसंघात  दौरा करत आहेत. या दौऱ्या दरम्यान डोंबिवलीचा (Dombivali) दौऱ्यासह कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात देखील दौरा केला. यावेळी त्यांनी भाजप (BJP) कार्यकर्त्यांसह व्यापाऱ्यांची देखील बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर सायंकाळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC Mahapalika) मुख्यालयाला भेट देत स्मार्ट सिटी कार्यालयाचे सुरू असलेल्या यंत्रणेचा आढावा घेतला. तरी कल्याण डोंबिवली परिसरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत अनुराग ठाकुर यांनी नाराजी व्यक्त केली.



संबंधित बातम्या

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

IND W Beat WI W 1st T20I Match Scorecard: पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 49 धावांनी केला पराभव, तीतास साधूची प्राणघातक गोलंदाजी

Delhi Assembly Election 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपने जाहीर केली 38 उमेदवारांची यादी; अरविंद केजरीवाल आणि आतिशी कोठून निवडणूक लढवणार? वाचा

MUM Beat BRD, SMAT 2024 Semi Final 1 Scorecard: मुंबईचा बडोद्यावर 6 विकेट्सने विजय; सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश, अंजिक्य रहाणेच्या शानदार 98 धावा