Maharashtra Diwali 2020 Bumper Lottery: राजश्री 1000 स्पेशल लॉटरी सोडत निकाल आज संंध्याकाळी 8.30 वाजता; bookmyrajshree.com वर पहा रिझल्ट
यंदा दिवाळी निमित्त काढलेल्या राजश्री 1000 स्पेशल लॉटरीचा आज (25 नोव्हेंबर) निकाल आहे. दरम्यान या लॉटरीचं तिकीट काढलेल्यांचं आज संध्याकाळी त्याची जाहीर होणार्या सोडती निकालाकडे लक्ष लागले आहे.
Rajshree 1000 Special lottery Draw Date, Time: यंदा दिवाळी निमित्त काढलेल्या राजश्री 1000 स्पेशल लॉटरीचा (Rajshree 1000 Special lottery) यंदा दिवाळी निमित्त काढलेल्या राजश्री 1000 स्पेशल लॉटरीचा आज (25 नोव्हेंबर) निकाल आहे. दरम्यान या लॉटरीचं तिकीट काढलेल्यांचं आज संध्याकाळी त्याची जाहीर होणार्या सोडती निकालाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान यंदा पहिलं बक्षीस 2.5 कोटींचं आहे. 5 भाग्यवान विजेत्यांना प्रत्येकी 50 लाख जिंकता येणार आहेत. त्यामुळे पहा या निकालाचे अपडेट्स तुम्ही कुठे, कसे पाहू शकाल? आज राजश्री 1000 स्पेशल सोडतीच्या तिकीटाच्या निकाल संध्याकाळी 8.30 च्या सुमारास ऑनलाईन bookmyrajshree.com वर पाहता येणार आहे.
राजश्री 1000 स्पेशल ही दिवाळी निमित्त जारी केलेली खास लॉटरी मूळची मिझोराम सरकारची आहे. यामध्ये मिझोराम सरकार कडूनच त्यांचं आयोजन केले जाते. पण काही तिकीटांना महाराष्ट्र सर्कलमध्ये विक्रीसाठी ठेवलं जातं. दरम्यान राजश्री 1000 स्पेशल प्रमाणेच इतर नियमित लॉटरीज देखील उपलब्ध आहेत.
राजश्री 1000 स्पेशल लॉटरी
राजश्री 1000 स्पेशल लॉटरी सोडत- 25 नोव्हेंबर 2020
राजश्री 1000 स्पेशल लॉटरी सोडत वेळ- 8.30 संध्याकाळी
निकाल कुठे पहाल? - bookmyrajshree.com
दरम्यान आज राजश्री 1000 स्पेशल निकालामध्ये लॉटरीच्या तिकीटाची सोडत जाहीर करून अंतिम निकालामध्ये एकुण 65,000,000 रूपयांची बक्षीसं जाहीर केली जाणार आहेत. त्यामुळे यामध्ये तुमचा देखील नंबर लागतोय का हे नक्की पहा. Maharashtra Diwali 2020 Bumper Lottery Result: 'महाराष्ट्र दिवाळी भव्यतम सोडत' निकाल lottery.maharashtra.gov.in वर जाहीर; इथे पहा विजेत्यांची यादी.
काही सरकारामान्य लॉटरीमध्ये राजश्री लॉटरी हे एक आघाडीचं नाव आहे. यासोबतच महाराष्ट्र राज्य लॉटरी, डिअर लॉटरी यांच्याकडूनही दिवाळीच्या निमित्ताने दिवाळी बंपर लॉटरी जाहीर करण्यात आल्या होत्या. त्याचे निकाल यापूर्वीच ऑनलाईन जाहीर करण्यात आले आहेत.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 25, 2020 09:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

