ठाणे: दिव्यातील व्यावसायिक राजकांत पाटील डियर लॉटरीज बैसाखी बंपर 2021 ड्रॉ चे मानकरी; जिंकले 5 कोटी

कोरोनाशी लढून आल्यानंतर काही दिवसांतच राजकांत पाटील यांना ते डियर लॉटरीज बैसाखी बंपर 2021 ड्रॉ चे मानकरी असल्याचं समजलं आणि एका रात्रीत त्यांचं आयुष्य पालटलं आहे.

Lottery | (Photo Credits: Pixabay)

कोरोना संकटामुळे सध्या सगळीकडेच पुन्हा निराशा आणि हतबलता पसरली आहे. ठाण्यात राहणार्‍या राजकांत पाटील यांचं देखील आयुष्य काही दिवसांपूर्वीपर्यंत असेच होते. राजकांत कोरोनाबाधित असल्याने त्यांना काही दिवस हॉस्पिटलमध्ये राहून उपचार घ्यावे लागले. पण हॉस्पिटलमधून परतल्यानंतर काही दिवसांतच त्यांचं नशीब पालटलं आहे. कोरोनाशी लढून आल्यानंतर काही दिवसांतच त्यांना ते डियर लॉटरीज बैसाखी बंपर 2021 ड्रॉ चे मानकरी असल्याचं समजलं आणि एका रात्रीत त्यांचं आयुष्य पालटलं आहे.

टीव्ही 9 मराठीच्या वृत्तानुसार, राजकांत पाटील ठाण्यातील दिवा भागात आपली पत्नी, आई आणि दोन मुलांसोबत राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली या आजारावर त्यांनी मात केली. हॉस्पिटलमधून परतल्यानंतर त्यांना डियर लॉटरीकडून संपर्क साधण्याविषयी एक मेसेज आला होता.

सुरवातीला ते थोडे गोंधळलेले होते कारण ते अनेक दिवस आजारी होते आणि हा मेसेज नेमका कशा संदर्भात आहे कळत नव्हते. पण अखेरत्यांनी डिअर लॉटरीशी संपर्क साधला. समोरून मला डियर लॉटरीज बैसाखी बंपर 2021 ची लॉटरी लागल्याचं आणि मी 5 कोटींचा मानकरी असल्याचं त्यांनी सांगितलं. हे ऐकल्यानंतरही काही काळआनंदाने तोंडातून शब्दच फूटत नसल्याचं त्यांनी सागितलं. Dear Lottery Free Home Delivery: खुशखबर! सरकारमान्य 'डियर लॉटरी' ची महाराष्ट्रात मिळणार मोफत घरपोच डिलिव्हरी, बंपर बक्षिसाची किंमत 5 कोटी.

सध्या लॉकडाऊन असल्याने डिअर लॉटरी ग्राहकांना घरपोच तिकीट देत आहे. अवघ्या 6 रूपयांच्या तिकीटामध्ये कोट्यावधीची बक्षीसं मिळवण्याची ही लॉटरी संधी देते.

1991 पासून डिअर लॉटरी भारतात आली. त्यानंतर त्याला देशातील अनेक राज्यांतून चांगला प्रतिसाद मिळाला आणि ती लोकप्रिय झाली. डियर लॉटरी ही भारतातील पहिली अशी लॉटरी आहे ज्याची सोडत टिव्हीवर लाईव्ह केली जाते. ही लॉटरी एशिया पॅसिफिक लॉटरी असोसिएशनची सदस्य सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला जर ही लॉटरी खरेदी करायची असेल तर तुम्हाला त्यांनी दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन ती ऑर्डर करावी लागले. त्यानंतर तुमच्या दारी येऊन डिलिव्हरी बॉय ती लॉटरी देतील.