IPL Auction 2025 Live

Maharashtra Agriculture Awards: शरद पवारांचे पुतणे, पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्काराचे मानकरी राजेंद्र पवार यांनी 'या' कारणावरून राज्यपाल BS Koshyari यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणं टाळलं!

RAJENDRA PAWAR | Twitter

कृषी विभागाकडून दिल्या जाणार्‍या पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कारांच्या मानकर्‍यांपैकी एक राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांनी आज वितरण सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. त्यांनी आपल्या अनुपस्थितीचं कारण देताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor BS Koshyari) यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारणार नसल्याचं म्हटलं आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानं करत राज्यात अशांतता निर्माण केली त्यांच्याकडून पुरस्कार स्वीकारणं मान्य नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान राजेंद्र पवार हे एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे आहेत तर आमदार रोहित पवार यांचे वडील आहेत. 2019 चा डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार राजेंद्र पवार यांना जाहीर झाला होता. आज नाशिक मध्ये या पुरस्कारांचे वितरण पार पडले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादा भुसे उपस्थित होते तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती ऑनलाईन होती. नक्की वाचा: कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अन्नदेवता शेतकरी व अधिकारी यांचा सन्मान सोहळा .

राजेंद्र पवार यांची प्रतिक्रिया

राज्यपालांपेक्षा हा पुरस्कार राज्य सरकारच्या ज्या कृषी विभागाने दिला आहे त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन स्वीकारणं अभिमानास्पद वाटेल असेही राजेंद्र पवार यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोना संकटामुळे लांबणीवर पडलेला पुरस्कार सोहळा आज नाशिक मध्ये पार पडला. यामध्ये 2017 मधील 64 शेतकरी, 2018 मधील 64 आणि 2019 मधील 70 विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे.