राज ठाकरे यांचे भाकीत खरे ठरले; 'निवडणुकीनंतर शिवसेना राष्ट्रवादी सोबत जाणार तर, भाजप विरोधी पक्षात बसणार'
यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राजकीय परिस्थितीवर गेल्या दोन वर्षापूर्वी केलेले भाष्य सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) सत्ता स्थापनेचा प्रश्न लवकरच सुटणार असून राज्यात शिवसेना (ShivSena), काँग्रेस (Congress) यांचे सरकार येणार जवळपास स्पष्ट झाले. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राजकीय परिस्थितीवर गेल्या दोन वर्षापूर्वी केलेले भाष्य सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी नाशिक येथील सभेत शिवसेना पक्षाच्या राजकीय भविष्यावर भाष्य केले होते. निवडणुकीनंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार तर, भाजप विरोधी पक्षात बसणार असे वक्तव्य राज ठाकरे यांनी त्यावेळी केले होते. सत्तास्थापनेबाबत काँग्रेस पक्षाकडून शिवसेनेला हिरवा कंदील मिळाला असून लवकरच राज्यात महाशिवआघाडीचे सत्ता स्थापन होणार असल्याचे संकेत मिळत आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहून राज ठाकरे यांनी वर्तवलेले भाकीत आज खरे ठरण्याची शक्यता आहे.
शिवसेना- भाजप महायुतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकत्र विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात वाद सुरु झाला आणि अखेर युती तुटली. दिल्लीतून काँग्रेस श्रेष्ठींनी सत्ता स्थापनेसाठी हिरवा कंदील दाखवल्यावर आता पुढील चर्चेसाठी तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी तीन नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे. यामध्ये सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला निश्चित होईल, अशी माहिती समोर आली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता गेल्या दोन वर्षापूर्वी राज ठाकरे यांची नाशिक येथे सभा पार पडली होती. दरम्यान, राज ठाकरे म्हणाले होती की, "भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणुका लढवणार...आणि निवडणुका झाल्या की शिवसेना राष्ट्रवादी पक्षासोबत जाणार आणि भाजप विरोधी पक्षात बसणार...हा काय पत्तांचा क्लब आहे का? माझे पिसून झाले, आता तुझे पिस म्हणायला", असे भाकीत राज ठाकरे यांनी त्यावेळी केले होते. हे देखील वाचा- मुंबईच्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज निवडणूक; शिवसेनेची सत्ता कायम राहणार
राज ठाकरे यांचे भाषण-
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यात कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार असे प्रश्न सर्वांनाच पडले होते. यावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शिवसेना पक्षाला हिरवा कंदील दाखवून अशा प्रश्न चिन्हावर पूर्णविराम लावल्याचे समजत आहे. यासाठी आज तिन्ही पक्षाची बैठक होणार असून तिन्ही पक्षांची मंत्रिपदांच्या वाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.