Raj Thackeray: अमित ठाकरे यांच्याकडे मनसे मोठी जबाबदारी सोपवणार? आदित्य शिरोडकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर MNS विद्यार्थी सेनेचे नेतृत्व करण्याची शक्यता

आदित्य शिरोडकर यांनी मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष पदाचा राजीनामा देत नुकतात शिवसेना पक्ष प्रवेश कला. या पक्षप्रवेशानंतर मनसे विद्यार्थी सेनेची सूत्रे कोणाकडे जाणार यााबत उत्सुकता आहे.

Amit Raj Thackeray | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) नेतृत्व युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्याची शक्यता आहे. आदित्य शिरोडकर यांनी मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष पदाचा राजीनामा देत नुकतात शिवसेना पक्ष प्रवेश कला. या पक्षप्रवेशानंतर मनसे विद्यार्थी सेनेची सूत्रे कोणाकडे जाणार यााबत उत्सुकता आहे. ही जबाबादारी अमित यांच्याकडे जाणार असल्याचे समजते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अमित ठाकरे आणि मनसे नेते संदिप देशपाडे हे राज यांच्या भेटीसाठी नाशिकला रवाना झाले आहेत. अमित यांच्या नेतृत्वाबाबत आज घोषणा होऊ शकते.

मनसे विद्यार्थी सेनेचे नेतृत्व आदित्य शिरोडकर यांच्याकडे होते. मात्र, नुकताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती शिवसेना प्रवेश केला. त्यामुळे हे पद रिक्त झाले. आदित्य शिरोडकर यांचे पक्ष सोडणे हे मनसेसाठी धक्कादायक मानले जात आहे. दरम्यान, आता या संघटनेची धुरा स्वत: अमित ठाकरे यांच्याकडेच सोपवली जाण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक येथे पत्रकार परिषद घेऊन आज घोषणा करण्याची शक्यात आहे. (हेही वाचा, MNS अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणू शकत नाहीत- चंद्रकांत पाटील)

मुंबई महापालिका निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये पार पडत आहे. त्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहे. मनसेही जोरदार कामाला लागली आहे. मनसेही याला अपवाद नाही. दरम्यान, सुरुवातीचा बहराचा काळ वगळता मनसेला अपेक्षीत यश गाठण्यात नेहमीच अपयश आल्याचे पाहायला मिळते. त्यातच अनेक पदाधिकारी पक्ष सोडून गेल्याने पक्षसंघटना अधिक खिळखिळी झाली आहे. आता आदित्य शिरोडकर यांनीही विद्यारथी सेनेचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी विद्यार्थी सेनेची जबाबदारी अमित यांच्याकडे सोपवली जाण्याची चिन्हे आहेत.