राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व सभांचा खर्च सादर करावा, निवडणुक आयोगाचे आदेश
तसेच प्रचारसभेतून सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्यावर जोरदार टीका केली.
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी लोकसभा निनडणुकीच्या पार्श्वभुमीवर प्रचारसभा घेतल्या. तसेच प्रचारसभेतून सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शहा (Amit Shah) यांच्यावर जोरदार टीका केली. तर भाजप पक्षाच्या काही नेत्यांनी याबद्दल निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार केली होती. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने भाजप कडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची दाखल घेत राज ठाकरे यांना सर्व सभांचा खर्च सादर करावा असे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्रात 10 विविध ठिकाणी राज ठाकरे यांनी मोदी आणि अमित शहा यांच्या विरुद्ध प्रचारसभा घेतल्या. त्यावेळी राज ठाकरे यांनी मोदी यांच्या गेल्या 5 वर्षातील कामांचा आढावा घेत व्हिडिओच्या माध्यमातून प्रचारसभेत पोल खोल करण्याचा प्रयत्न करता दिसून आले. मात्र भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात निवडणुक आयोगाकडे तक्रार दाखल केली.(राज ठाकरे यांच्या प्रचारसभा कोणासाठी? विनोद तावडे यांचे मुख्य निवडणुक अधिकाऱ्यांना पत्र)
मात्र राज ठाकरे निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सांगितले होते. त्याचसोबत मोदी आणि शहा यांच्या विरुद्ध राज्यात विविध ठिकाणी सभा घेणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेचा खर्च कोणाच्या खात्यातून केला जातो असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला होता. परंतु आता निवडणूक आयोगाकडे राज ठाकरे कोणत्या उमेदवाराच्या नावावर आपल्या प्रचारसभेचा खर्च दाखवणार हे पाहणे महत्वाचे आहे.