IPL Auction 2025 Live

Raj Thackeray चा राज्य सरकार वर हल्लाबोल; मंदिरं उघडा अन्यथा घंटनाद आंदोलनाचा इशारा

मग नियम असतील तर ते सर्वांना सारखेच असल्याचं सांगत राज ठाकरेंनी सरकार वर हल्लाबोल केला आहे.

Raj Thackeray | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) आज राज्य सरकारचे नियम धुडकावत मुंबई मध्ये दहीहंडी (Dahi Handi) सण साजरा करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी मनसैनिकांवर कारवाई करत त्यांची धरपकड केली असून गुन्हे दाखल केले आहेत. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. 'लॉकडाऊन आवडे सरकारला' अशी परिस्थिती आहे त्यामुळे आम्ही यंदा दहीहंडी सण साजरा केला आहे असे राज ठाकरेंनी म्हटलं आहे. कोरोनाचे निर्बंध हिंदू सणांनाच का? असा सवाल विचारताना त्यांनी सरकारला मंदिरं उघडा अन्यथा येत्या काही दिवसांत मनसे राज्यभर घंटानाद आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिला आहे. Dahi Handi 2021: दही हंडी फोडण्याच्या बंदीला झुगारून मनसेने फोडली हंडी, याप्रकरणी 5 कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक .

एकीकडे सरकार कोरोनाचं कारण सांगून निर्बंध जाहीर करते पण दुसरीकडे राज्य सरकार मधील नेत्यांची मुलं आंदोलनं, देवळात अभिषेकासाठी बसलेले दिसतात. मग नियम असतील तर ते सर्वांना सारखेच असल्याचं सांगत सरकार वर हल्लाबोल केला आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी किमान प्रतिकात्मक दहीहंडी फोडली आहे. यावेळी उपस्थित मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये ठाण्याचे अविनाश जाधव, मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा समावेश आहे. यावरून सरकार सूडबुद्धीने कारवाया करत असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगताना आमच्यावर पडणार्‍या केसेसची पर्वा करत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या कमी झाल्या नाहीत. आंदोलन, जनआशिर्वाद यात्रेत लोकांची संख्या कमी नाही त्यामुळे सणांवरच बंधन का? म्हणून मी सैनिकांना सांगितलं सुरू करा. जे होईल ते होईल, असे राज ठाकरे म्हणाले. दरम्यान मंदिरं खुली करण्यासाठी काल भाजपाने देखील राज्यात आंदोलन केले आहे त्याला आता मनसेची देखील साथ मिळण्याची शक्यता आहे. पण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी 'देऊळबंद' वर प्रतिक्रिया देताना हा केंद्र सरकारचाच आदेश असल्याचं सांगितलं होतं.