Pune Rains Update: पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शरद पवार यांची बारामती तुडूंब, अनेक घरांत पाणी शिरले, इंदापूरात 40 जणांचे प्राण वाचवले

पाणी पातळी अचानक वाढण्याची शक्यता गृहित धरुन नदीकाटच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाआहे.

Flood-like situation in Baramati | (Photo Credits: ANI)

Maharashtra Rains Update: संपूर्ण महाराष्ट्रासह पुणे (Pune) जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. परतीचा पाऊस यंदा नेहमीच्या तुलनेत काहीसा अधिकच प्रसन्न झाला आहे. त्यामुळे नागरिकांवर पावसाला 'आता पुरे रे बाबा..' म्हणण्याची वेळ आली आहे. पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्ठी झाली आहे. शरद पवार यांच्या बारामती (Baramati Rains Update) येथेही जोरदार पाऊस कोसळत आहे. बारामती (Baramati) येथे अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसले आहे. सकल भाग तुडूंब भरले आहेत. याशिवाय पुरंदर, इंदापूर, जुन्नर, मावळ, भोर, शिरूर, पुणे शहर आदी तालुक्यांतही मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे.

पुणे शहर परिसरात बुधवार रात्रीपासूनच दमदार पाऊस पाहायला मिळत आहे. बुधवारी रात्री, गुरुवारी दिवसभर आणि काल रात्रीसह आज सकाळीही दमदार पाऊस पाहायला मिळाल. या पावसामुळे शहरात सकल भागात पाणी साचले. रस्त्यांवरही पाणीच पाणी. नागरिकांच्या घरांमध्येही काही ठिकाणी पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. (हेही वाचा, Maharashtra Rains Update: पावसाचा फटकाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतिम वर्षाच्या आजच्या परीक्षा पुढे ढकलल्या)

पावसाचा जोर पाहून खडकवासला धरमातून पाण्याचा विसर्ग मुठा नदीपात्रास सुरु करण्यात आला आहे. पाणी पातळी अचानक वाढण्याची शक्यता गृहित धरुन नदीकाटच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाआहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती नर्माण झाली आहे. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या गावात पूर आल्याने 55 जण अडकून पडले. त्यातील 40 जणांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले. उर्वरीतांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. इंदापूर येथे 2 दुचाकीस्वारांना पाण्यात वाहून जाताना वाचवले. धरणाचे पाणी वाढल्याने पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवण, डाळज, पळसदेव आणि इंदापूर येथे उजनी धरणाचे पाणी आल्याने वाहतूक काही काळ बंद करण्यात आली आहे.