IPL Auction 2025 Live

Rain in Maharashtra: विजांचा कडकडाट, वादळ वारा, त्यात जलधारा; महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा फटका

त्याचा प्रभाव म्हणून राज्यातील अनेक ठिकाणी पर्जन्यवृष्टी होईल. तर वस मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्ता आहे.

Rain | Representational Image (Photo Credits: Pixabay)

एका बाजूला कोरोना व्हायरस (Coronavirus), दुसऱ्या बाजूला लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेलेल अर्थकारण यातून थोडी उसंत मिळते तोवर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस (Rain in Maharashtra) आला आहे. राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे हवालदिल झाले. परभणी, सांगली, उस्मानाबाद, सातारा, अकोला, भंडारा आदि जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला. पुढील दोन दिवस हवामान असेच राहिल असे, पुणे वेधशाळेनेे म्हटले आहे. अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, द्राक्ष बाग अशा पिकांना मोठा फटका बसला आहे. हवामानाची स्थिती अशीच राहिली पुढे अधिक नुकसान होऊ शकते.

पुणे वेधशाळेचा अंदाज

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात चक्रीय चक्रवत तयार झाले आहे. त्याचा प्रभाव म्हणून राज्यातील अनेक ठिकाणी पर्जन्यवृष्टी होईल. तर वस मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्ता आहे. (हेही वाचा, Maharashtra Rain Update: 13 ते 17 ऑक्टोबर दरम्यान राज्यात वीजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता; प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा)

कोणकोणत्या ठिकाणी पाऊस

राज्यातील परभणी, सांगली, उस्मानाबाद, सातारा, अकोला, भंडारा आदी जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला. परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. पोखर्णी, दैठणा परसरात वादळ वारा आणि विजा चमकल्या. सांगली जिल्ह्यातही अवकाळी पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला. द्राक्ष पिकांना या पावसाचा मोठा फटका बसला.

अवकाळी पावसामुळे सांगली परिसरात द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. दुसऱ्या बाजूला ज्वारी, हरबरा आदी पिकांनाही याचा मोठा फटका बसला.