Rats Inside Train Pantry Video: संतापजनक, रेल्वेच्या पेट्री कारमध्ये उंदारांचा धुमाकुळ, मडगाव एक्सप्रेसमधील व्हिडिओ व्हायरल
लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव एक्सप्रेस गोवा या ट्रेनमधून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
Rats Inside Train Pantry Video: लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव एक्सप्रेस गोवा या ट्रेनमधून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. ट्रेनच्या पेट्री डब्यात उंदरांचा धुमाकूळ घालणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. धक्कादायक म्हणडे रेल्वे विभागातून दरवर्षी लाखो रुपये उंदीरांचा नायलाटासाठी खर्च केले जात असते. १५ ऑक्टोबरला मंगरिश तेंडूलकर हा ट्रेन मधून प्रवास करत असताना हा व्हिडिओ कॅमेरात कैद केला.
६-७ उंदीर जेवणात सुसाट पळत होते. उंदीरांच्या या व्हिडिओ मुळे भारतीय रेल्वेच्या स्वच्छतेवर आणि निष्काळजीपणावर प्रश्नचिन्हा उभा केला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ पाहून अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेनंतर सदर व्यक्तीनी रेल्वे पोलिस कॉन्स्टेबलकडे तक्रा केली तर त्यांनी उलट उत्तर देवून त्यांनी फटवकारले, ट्रॅंक खाली ५०० ते ६०० उंदीर आहे त्यातील ५-६ आले असतील, यात एवढ कायं? यानंतर त्यांने IRCTCच्या रेल्वे अॅप तक्रार केली आहे.
उंदीरांचा त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी या तक्रारीत केली आहे. त्यामुळे मध्य रेल्वे येथे पेस्ट कंट्रोलबरोबरच इतर प्रकारच्या उपाययोजना करणार असल्याचे मध्य रेल्वने स्पष्ट केले आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी उलटसुलट उत्तरे देण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर वर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.