Mumbai Diesel Theft: पंपिंग मशीनमध्ये डिझेल चोरी केल्याप्रकरणी रेल्वे कंत्राटदारासह जेसीबी ऑपरेटराला अटक

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद इस्माईल शेख (जेसीबी ऑपरेटर) आणि संतोष पांडे (ठेकेदार) अशी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

अंधेरी (Andheri) रेल्वे संरक्षण दलाने (RPF) एका रेल्वे कंत्राटदाराला (Railway Contractor) आणि त्याच्याशी संबंधित अन्य एका व्यक्तीला डिझेल चोरी (Diesel theft) आणि विकल्याबद्दल अटक (Arrested) केली. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी चार डिझेल भरलेले ड्रम जप्त केले आहेत.  पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद इस्माईल शेख (जेसीबी ऑपरेटर) आणि संतोष पांडे (ठेकेदार) अशी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत. अंधेरी आरपीएफचे वरिष्ठ निरीक्षक विक्रम सिंह यांनी सांगितले की, आरोपी संतोष पांडेच्या चौकशीत तो गेल्या 5 वर्षांपासून रेल्वेत कंत्राटदार म्हणून काम करत असल्याचे आढळून आले.

पांडे यांना पश्चिम रेल्वेने बोरिवली ते चर्चगेट अंतर्गत येणाऱ्या एकूण 72 पंपिंग मशीनमध्ये डिझेल भरण्याचे कंत्राट दिले होते. पावसाळ्यात या सर्व 72 पंपिंग मशीनमध्ये डिझेल भरण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. करारानुसार रेल्वेकडून डिझेलचा पुरवठा करण्यात येणार होता. पांडे यांना रेल्वेकडून एकूण 3000 लिटर डिझेल देण्यात आले. हेही वाचा Kondeshwar तलावात वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या 4 मित्रांचा बुडून दुर्देवी मृत्यू

पाऊस संपल्यानंतर संतोष पांडे यांच्याकडे खर्च झालेल्या डिझेलचा हिशोब विचारला असता, संतोषने पोलिसांना सांगितले की, एकूण 3 हजार डिझेल पुरवण्यात आले, त्यापैकी 2200 डिझेल पंपिंग मशिनसाठी वापरण्यात आले. उर्वरित 800 लिटर डिझेल जेसीबी ऑपरेटर मोहम्मद इस्माईल शेख यांना रेल्वेचे दुसरे अधिकारी उमेश गुप्ता यांच्या संमतीने विकण्यात आले. ज्याची एकूण किंमत सुमारे 75000 रुपये आहे.

संतोष पांडे यांनी रेल्वे अधिकारी उमेश गुप्ता यांच्यावर लावलेल्या आरोपांना

उत्तर देताना पोलिसांच्या वतीने उमेश गुप्ता यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले. तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात आहे. गुप्ता यांच्याविरोधात आतापर्यंत कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.