IPL Auction 2025 Live

Irshalwadi Landslide: मृतांची संख्या 22 वर , NDRF ची शोधमोहीम सुरुच

एनडीआरएफने येथे आज पुन्हा शोधमोहीम सुरु केली आहे.

Irshalgad Landslide Death Toll: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात भूस्कलन होऊन ईर्शाळवाडी गावात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) अद्यापही संशोधन करते आहे. एनडीआरएफची एक तुकडी आज (22 जुलै) सकाळी भूस्खलनग्रस्त ठिकाणी पोहोचली. या ठिकाणावरुन आतापर्यंत 22 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अद्यापही काही मृतदेह हाती लागण्याची शक्यता आहे. आणखी काही तुकड्या शोधकार्यासाठी घटनास्थळी दाखल होण्याची शक्यता आहे. धुवांतार कोसळणारा पाऊस आणि जमणारे दाट धुके यामुळे शोधकार्यात अडथळे येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणने आहे.

राजकीय नेत्यांच्या भेटी वाढल्या

भूस्कलन घडलेले ठिकाण असलेली ईर्शाळवाडी मुंबईपासून साधारण 80 किमी अंतरावर आहे. हे गाव म्हणजे निसर्गसौदंर्याचा उत्कृष्ण नमुना होते. डोंगरुतारावर वसलेल्या या गावात असे काही घडेल अशी कोणी कल्पनाही केली नव्हती. दरम्यान, दुर्घटनाग्रस्त भागाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांनी कालच भेट दिली आहे. विरोधी पक्षातील आदित्य ठाकरे, नाना पटोले यांनीही या परिसराला भेट दिली. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुर्घटनाग्रस्तांची भेट घेणार आहेत. (हेही वाचा, Uddhav Thackeray ईर्शाळवाडी दौऱ्यावर, ठाणे येथील मेळावाही रद्द)

मृतांना आर्थिक मदत, जखमांवर सरकारी खर्चाने उपचार

राज्य सरकारने ईर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये तर जखमींवर शासकीय खर्चांमध्ये उपचार केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. भूस्खलनाच्या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केली. शाह म्हणाले की बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या चार पथके तैनात करण्यात आली आहेत. शुक्रवारी आणखी पाच मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि खराब हवामानामुळे जिल्हा प्रशासनाच्या सल्ल्याने शोध आणि बचाव कार्य दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले, असे एनडीआरएफच्या 5 बटालियनचे कमांडंट एसबी सिंग यांनी सांगितले.

एनडीआरएफ तुकडीतील श्वानांकडूनही शोध

आम्ही आमच्या तीन कुत्र्यांसह शोध आणि बचाव कार्य केले आणि आमच्या एका कुत्र्याला आज दोन मृतदेह सापडले. आम्ही अनेक आव्हानांना तोंड देत आहोत आणि (भूस्खलनग्रस्त) साइटवर आमची अद्ययावत यंत्रसामग्री घेऊन जाऊ शकत नाही, असे एनडीआरएफच्या अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले.