Holiday For All Schools In Raigad: मुसळधार पाऊस, रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
प्रमाण कमी असले तरी राज्यातील विविध ठिाकाणी तो बरसतो आहे ही समाधानाची बाब आहे. रायगड जिल्ह्यात पावासाचा जोर वाढला असून, पाताळंगा नदीला पूर आला आहे. नदीच्या पाणीपातळीने धोक्याची इशारा पातळी ओलांडली आहे.
Heavy Rain in Raigad District: हवामान विभागाने पालघर, रायगड जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे तर मुबई आणि रत्नागिरी जिल्ह्यातही Orange Alert जारी केला आहे. जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी (Holiday For All Schools In Raigad) जाहीर केली आहे. राज्यात काहीसा उशीरा सुरु झालेल्या पावसाला हळूहळू सूर गवसताना दिसत आहे. प्रमाण कमी असले तरी राज्यातील विविध ठिाकाणी तो बरसतो आहे ही समाधानाची बाब आहे. जिल्ह्यात पावासाचा जोर वाढला असून, पाताळंगा नदीला पूर आला आहे. नदीच्या पाणीपातळीने धोक्याची इशारा पातळी ओलांडली आहे. शिवाय अंबा, कुंडलिका आणि सावित्री या नद्याही दुथडी भरुन वाहात आहेत. खास करुन मध्यरात्रीसून मेघराजा धुवांधार बरसतो आहे. परिणामी सखल भागात पाणी साचू लागले आहे. प्रशासनाे सखल आणि नदी किनारी वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे.
पाऊस दमदारपणे रात्रभर पडत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. खास करुन नेरळ कळंब रस्त्यावरचा दहीवली पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे वाहतूक बंग करावी लागली आहे. वाहतूक ठप्प झाल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाही पाहायला मिळत आहे. जवळच असलेल्या उरणच्या चिरनेर गावातही पाण्याने शिरकाव केला आहे. (हेही वाचा, Maharashtra Rain Update: राज्यात मुसळधार तर कोकणात अतिवृष्टीची शक्यता, हवामान विभागाने वर्तवला अंदाज)
हवामान विभागाने अंदाज व्यक्त करताना पुढचे पाच दिवस महत्त्वाचे आहेत. या कालावधीत राज्यात विविध ठिकाणी हलका, मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, असे आयएमडीने म्हटले आहे. कोकण, पुणे, विदर्भासाठी आगोदरच इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये इशान्य दिशेला तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भातील वातावरण बदलत आहे. परिणामी पर्जन्यवृष्टीची शक्यता आहे. शिवाय, अरबी समुद्रावरुन येणारे मोसमी वारेही जोरकसपणे वाहू लाहल्याने पश्चिम किनारपट्टीवर पावसाला पूरक स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पर्जन्यवृष्टी अधिक होण्याची शक्यता आहे.