मुंबई येथील 250 स्थलांतरीत कामगारांना राहुल तरुण मित्र मंडळ असोसिएशन तर्फे अन्नदान

अशा स्थलांतरीत कामगारांचे अन्न, निवारा मिळानासा झाला. दरम्यान अशा स्थलांतरीत कामगारांसाठी समाजातील अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या आहेत.

Migrant Workers in Mumbai (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढता धोका विचारात घेत भारत देश 21 दिवसांसाठी लॉकडाऊन (Lockdown) करण्यात आला. यामुळे उपजिवीकेसाठी महानगरांमध्ये आलेल्या आणि हातावर पोट असलेल्या कामगारांचे प्रचंड हाल झाले. अशाच 250 स्थलांतरीत कामगारांना राहुल तरुण मित्र मंडळ असोसिएशनतर्फे (Rahul Tarun Mitra Mandal Association) आज (शुक्रवार, 3 एप्रिल) अन्नदान करण्यात आले.  त्यापैकी एका कामगाराने सांगितले की, "मी कामाच्या शोधात येथे आलो होतो. सध्या आम्ही इथेच राहतो. आम्हाला अशाप्रकारे जेवण मिळते. मी सरकारला विनंती करतो की आमची मदत करा." हे स्थलांतरीत कामगार मुंबई येथील उड्डाणपुलाखाली सध्या वास्तव्यास आहेस.

लॉकडाऊन काळात कोणीही प्रवास करु नका, आहात तिथेच रहा असे आवाहन सरकारकडून करण्यात आले. तसंच जीवनावश्यक सेवा वगळता सारे व्यवहार ठप्प करण्यात आले. रेल्वे, बस इत्यादी वाहतूकीचे मार्ग बंद करण्यात आले.  काम नसल्यामुळे आलेली बेजरोजगारी आणि घरी परतण्यासाठी उपलब्ध नसलेला मार्ग या पेचात कामगार बेजार झाले. अशा स्थलांतरीत कामगारांना अन्न, निवारा मिळानासा झाला. दरम्यान अशा स्थलांतरीत कामगारांसाठी समाजातील अनेक सेवाभावी संस्था पुढे आल्या आहेत. (महाराष्ट्र राज्यातील 262 मदत केंद्रातुन 70,399 स्थलांतरित कामगारांना मिळणार अन्न आणि आश्रय: CMO)

ANI Tweet:

यापूर्वी लॉकडाऊनमुळे बेहाल झालेल्या अनेक कामगारांचे फोटोज, व्हिडिओज समोर आले होते. त्यानंतर सरकारकडून यांच्यासाठी विशेष पाऊल उचलण्यात आले. स्थलांतरीत कामगारांसाठी मदतकेंद्रे उभारण्यात आली असून त्याद्वारे त्यांच्या राहण्याची आणि अन्नाची सोय करण्यात येणार आहे.



संबंधित बातम्या

South Africa vs Pakistan 1st ODI 2024 Live Streaming: आज पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण

Zimbabwe vs Afghanistan ODI Stats: वनडे सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात कसा आहे विक्रम, येथे जाणून घ्या हेड टू हेड, सर्वाधिक धावा आणि विकेट घेणारे खेळाडूंची आकडेवारी

Maharashtra Cabinet Expansion: ‘जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं...'; मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने Chhagan Bhujbal यांचे राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

IND W vs WI W 2nd T20I 2024 LIVE Streaming: आज मालिका जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ सज्ज, तर वेस्ट इंडिजचे लक्ष पहिल्या विजयाकडे; त्याआधी जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना