निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राहुल गांधी आज मुंबई आणि धुळ्यात सभा घेणार
काँग्रेस (Congress) अध्यक्ष राहुल गांधी आज शुक्रवारी (1 मार्च) रोजी महाराष्ट्रात दौऱ्यावर येणार आहेत.
काँग्रेस (Congress) अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आज शुक्रवारी (1 मार्च) रोजी महाराष्ट्रात दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांनी मुंबई आणि धुळ्यात जाहीर सभेचे आयोजन केले आहे. येत्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनाने ही सभा महत्वाची ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी निश्चित झाली आहे. तसेच बहुजन वंचित आघाही सोबतही गठबंधन बांधण्यात तयारीचे प्रयत्न काँग्रेसकडून केले जात आहेत. धुळ्यात राहुल गांधी यांची सभा 1 वाजता होणार आहे. तर मुंबईत संध्याकाळी 5 वाजता बांद्रा-कुर्ला कॉप्लेक्स येथील एमएमआरडीएच्या मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.(हेही वाचा-काँग्रेस आमदाराच्या मुलावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा, अधिकाऱ्याची बदली)
राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. तसेच रस्त्यांच्या दुतर्फा काँग्रेस पक्षाकडून राहुल गांधींचे पोस्टर झळकवण्यात आले आहेत.