Rahul Gandhi On Adani Group: अदानी समूहातील पैसा कोणाचा? राहुल गांधी यांचा PM नरेंद्र मोदी यांना सवाल
त्यासाठी जगभरातील लोक, प्रमुख नेते भारतात येत आहेत. नेमके त्याच वेळी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांतून एक वृत्त आले आहे. ज्यामध्ये गौतम अदानी यांचा अदानी समूह (Adani Group) आणि त्यातील कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आलेला पैसा कोणाचा आहे?
Rahul Gandhi Press Conference in Mumbai: काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Rahul Gandhi on Narendra Modi) यांच्यातील कथीत आर्थिक संबंधांवरुन जोरदार हल्लाबोल केला आहे. इंडिया आघाडीची एक बैठक मुंबई येथे पार पडत आहे. या बैठकीसाठी आल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी म्हटले की, G20 परिषद देशात पार पडत आहे. त्यासाठी जगभरातील लोक, प्रमुख नेते भारतात येत आहेत. नेमके त्याच वेळी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांतून एक वृत्त आले आहे. ज्यामध्ये गौतम अदानी यांचा अदानी समूह (Adani Group) आणि त्यातील कंपन्यांमध्ये गुंतवण्यात आलेला पैसा कोणाचा आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्द्यावर एक संयुक्त संसदीय समिती स्थापन करुन चौकशी करावी, अशी मागणीही राहुल यांनी केली.
राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, मुंबई शेअर बाजारातील अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग कृत्रिमरित्या फूगवले जातात. त्यातून पैसा कमावला जातो. ज्याचा वापर देशातील सरकारी कंपन्या, मालमत्ता विकत घेण्यासाठी केला जातो. यामध्ये विनोद अदानी नावाचा सूत्रधार आहे. ज्याच्याद्वारे अदानींचा पैसा विदेशात वळवला जातो आणि पुन्हा भारतात आणला जातो. विनोद हा गौतम अदानी यांचा भाऊ आहे.
व्हिडिओ
विनोद अदानी यांना दोन विदेशी व्यक्ती भारतील पैसा विदेशात नेऊन परत भारतात आणण्यास मदत करतात. एकाचे नाव आहे नसिर अली शबान अहली आणि दुसरा आहे चांग चुंग लिंग. जो चीनी गृहस्थ आहे. अदानी भारतातील संरक्षण, पोर्ट आणि इतरही अनेक महत्त्वाच्या ठिकाणी काम करतात. त्यामुळे या प्रकल्पांमध्ये या विदेशी व्यक्तीची भूमिका नेमकी काय आहे? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
व्हिडिओ
देशामध्ये पारदर्शकता हवी. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची तशी चौकशी केली जावी. ही वृत्तपत्रे कोणी स्थानिक नाहीत. ज्यांचा भारताच्या आर्थिक धोरणांवर परिणाम पडतो. ती स्वायत्त आहेत. त्यामुळे त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्वाचे ठरतात असे राहुल गांधी म्हणाले.