Mahila Nyay Guarantee Yojna: राहुल गांधींकडून 'महिला न्याय' हमी योजनेची घोषणा; गरीब महिलांना 1 लाख रुपये देणार, सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षण

ज्यात गरीब महिलांना 1 लाख रुपये देण्यात येतील. त्याशिवाय, सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के कोटा महिलांसाठी राखीव ठेवण्यात येईल. तसेच, महिलांसाठी वसतिगृहांचा समावेश असेल.

Rahul Gandhi | (Photo Credits: Facebook)

Mahila Nyay Guarantee Yojna: राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' (Bharat Jodo Nyay Yatra) राज्यातील धुळे जिल्ह्यात दाखल झाली आहे. या दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधींनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. महिलांसाठी 'महिला न्याय' (Mahila Nyay) हमी योजना जाहीर केली आहे. ज्यात गरीब महिलांना 1 लाख रुपये, सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षण आणि महिलांसाठी वसतिगृहांचा समावेश आहे. आम्ही या देशातील गरीब जनतेच्या पाठीशी उभे आहोत. त्यामुळे, आमची हमी ही देशातील जनतेला दिलेले वचन आहे असे काँग्रेसचे (Congress) सरचिटणीस केसी वेणुगोपाल (KC Venugopal) म्हणाले आहेत.(हेही वाचा : EC Advisory to Rahul Gandhi: पंतप्रधानावरील वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाकडून राहुल गांधी यांना सल्लागार जारी, भविष्यात अधिक सावध राहण्याचा दिला सल्ला )



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif