Radhakrishna Vikhe Patil On Congress: काँग्रेसचे अस्तित्व राहिलं कुठं? मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा कॉंग्रेसला खोचक टोला
कॉंग्रेसमधील नेते मंडळींसह कॉंग्रेस नेतृत्वाला देखील पक्षासाठी किंवा पक्षाच्या अस्तित्वासाठी स्वारस्य राहिलेला नाही अशी असा खोचक टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेसला लगावला आहे.
कधी काळी कॉंग्रेसी (Congress) असलेल्या राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrishna Vikhe Patil) यांनी आज थेट कॉंग्रेससह कॉंग्रेसच्या नेतृत्वावर हल्लाबोल केला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सध्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान पत्रकांशी संवाद साधताना विखे पाटील म्हणाले आता कॉंग्रेसचं अस्तित्व उरलं कुठे, केवळ मंत्री पदासाठी कॉंग्रेसचं अस्तित्व होतं. कॉंग्रेसमधील नेते मंडळींसह कॉंग्रेस नेतृत्वाला देखील पक्षासाठी किंवा पक्षाच्या अस्तित्वासाठी स्वारस्य राहिलेला नाही अशी असा खोचक टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेसला (Congress) लगावला आहे.
वाळू माफियांचा उन्माद ही संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, यातून गुन्हेगारी वाढलेली आहे. हे थांबवण्यासाठी काही धोरण आणावे लागेल. अशी प्रतिक्रीया वाळू माफियांविरोधात राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. तरी महसूल खाते हे राज्यातील महत्वाच्या खात्यांपैकी एक आहे. राज्यात नुकत्याचं पार पडलेल्या खातेवाटपात राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल खातं देण्यात आलं आहे. तरी संबंधीत बाबीवर तसेच वाळू माफियांच्या गंभीर प्रश्नांवर राधाकृष्ण विखे पाटील काय पाऊल उचलतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.(हे ही वाचा:- Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis: 'फडणवीस बाळासाहेबांच्या नावाने मते मागत आहेत, हे मोदी युग संपल्याचे लक्षण', उद्धव ठाकरेंच्या टीकेवर भाजपचे प्रतिउत्तर)
राधाकृष्ण विखे पाटील हे एक वेळचे पक्के कॉंग्रेसी. पण आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी फक्त कॉग्रेसवरचं नाही तर थेट कॉंग्रेस नेतृत्वावर देखील भाष्य केल. तसेच येणाऱ्या लोकसभा निवडणूकीवर (Loksabha Election) देखील त्यांनी भाष्य केले आहे. शिर्डी (Shirdi) लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेतील त्या पद्धतीने काम करायचे असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नमूद केले आहे.