पुणे: शिक्षकाकडून 6 महिन्यांपासून 12 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार
जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाने एक-दोन नव्हे तर तब्बल 12 अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे
जिल्हा परिषदेच्या शाळेतील (Zilla Parishad school) एका शिक्षकाने एक-दोन नव्हे तर तब्बल 12 अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पुण्यातील (Pune) लोहगाव येथील ही घटना असून याप्रकरणी संबंधित शिक्षकावर विमातळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम पोतदार असे या आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
विक्रम पोतदार पदवीधर असून तो जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो शाळेतील 12 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शाळेच्या मधल्या सुट्टीत तो मुलींना एका खोलीत डांबून त्यांच्यावर अत्याचार करत असे आणि याबद्दल कोणालाही सांगायचे नाही असा दमही भरत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने गर्भवती झाली, सरकारी कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल)
या सर्व मुली 11-12 या वयोगटातील आहेत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत असून शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.