Pune Sextortion Crime: पुण्यातील तरुणाई Honey Trap च्या जाळ्यात; Nude Video फेसबुक फ्रेंड्सना पाठविण्याची धमकी, दोन गुन्हे, 150 तक्रारी दाखल

या प्रकरणात पुणे पोलिसांकडे दोन गुन्हे आणि जवळपास 150 तक्रारी दाखल झाल्या आहेत.

Honey Trap | Photo Credits: Archived, edited, symbolic images- Pixabay.com)

लॉकडाऊन काळात पुण्यातील तरुणासी मोठ्या प्रमाणावर सेक्सटॉर्शनची (Sextortion) आणि हनी ट्रॅप (Honey Trap) च्या जाळ्यात अडकत असल्याचे पुढे आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांकडे दोन गुन्हे आणि जवळपास 150 तक्रारी दाखल झाल्या आहेत. काही तरुणींकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढले जात आहे. नंतर त्यांच्याशी खासगी संवाद वाढवून त्याचे व्हिडिओ चित्रीत केले जात आहेत. नंतर ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी केली जात आहे. पैसे न दिल्यास चित्रीत केलेले व्हिडिओ फेसबुक फ्रेंड्स (Facebook Friends) ला पाठवण्याची धमकी दिली जात आहे. यातून अनेक तरुणांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळण्यात आल्याचे पुढे आले आहे.

गुन्हेगारांकडून सोशल मीडियावरील व्यक्तींचे फेसबुक अथवा इतर अकाऊंट तपासले जाते. त्यावरील फोटो, माहिती आणि पोस्ट यांवरुन त्याच्या आवडीनिवडी पाहिल्या जातात. त्यासोबतच त्याच्या फ्रेंडलिस्टमध्ये जाऊन त्याचे वर्तुळही तपासले जाते. इतके सगळे केल्यावर पुरेसा डाटा हातात येतो. मग अशा तरुणांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. मग हळूहळू इनबॉक्समध्ये संवाद केला जातो. सलगी वाढवली जाते. त्यातून मग पुढचा टप्पा सुरु होतो. अत्यंत खासगी संवाद सुरु करत गोष्टी अश्लिलतेपर्यंत जातात. पुढे गोष्टी जेव्हा अगदीच खासगी आणि संवेदनशील होतात तेव्हापासून सुरु होते पैशांची मागणी. तरुणांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे मागीतले जातात. हे पैसे द्यायला जेव्हा नकार दिला जातो तेव्हा ब्लॅकमेलींग सुरु होते. पैसे द्या नाहीतर व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला जाईल. फेसबुक फ्रेंड्सना पाठवला जाईल, अशी धमकी दिली जाते. (हेही वाचा, Honey Trap With MLA Dilip Mohite: आमदार दिलीप मोहिते पाटील यांना हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याचा कट उधळला; सातारा येथे तिघांवर गुन्हा दाखल)

प्राप्त माहितीनुसार, पुण्यातून आतापर्यंत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. तर, 150 पेक्षा अधिक तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. यात प्रामुख्याने श्रीमंत आणि मध्यमवर्गीय मुलांना जाळ्यात ओढल्याचे चित्र प्रथमदर्शनी पुढे आले आहे. मात्र, केवळ श्रीमंतच नव्हे तर काही सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनाही जाळ्यात ओढल्याचे पुढे आले आहे. अनेक लोक बदनामीच्या भीतीने पुढे येत नाहीत. काही लोक पोलिसांकडे मदत मागतात परंतू, तक्रार द्यायला तयार नसतात, असेही पुढे आले आहे. पुणे सायबर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. पोलीस आरोपींच्या मागावर आहेत. आरोपी दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान येथील असल्याचा प्राथमिक संशय आहे.