पुणे: कोंबड्याच्या आवाजामुळे झोपमोड होत असल्याने महिलेची पोलिसात धाव

पुणे (Pune) येथे एका महिलेने कोंबड्याच्या आवाजामुळे झोपमोड होत असल्याच्या कारणाने पोलिसात धाव घेतली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

पुणे (Pune) येथे एका महिलेने कोंबड्याच्या आवाजामुळे झोपमोड होत असल्याच्या कारणाने पोलिसात धाव घेतली आहे. या प्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली असून याची चर्चा सुरु झाली आहे.

तक्रार करणाऱ्या महिलेने पोलिसांनी नाव गुपीत ठेवले आहे. मात्र पहाटेच्या वेळी कोंबडा दररोज आरवतो त्यामुळे झोपमोड असल्याची तक्रार महिलेने केली आहे. त्यामुळे महिलेने दिलेल्या तक्रारीवर काय निर्णय घ्यावा याबद्दल पोलीस बुचकळ्यात पडले आहेत.(कामाठीपुरा येथून 100 पेक्षा अधिक देहविक्री करणाऱ्या महिलांची मुंबई पोलिसांकडून सुटका)

त्यामुळे कोंबडा किंवा त्याचा मालक यांच्यापैकी नक्की कोणा विरुद्ध कारवाई करावी याबद्दल पोलिसांना प्रश्न पडला आहे. यापूर्वी सुद्धा पुण्यातील कोथरुड मधील एका व्यक्तीने त्याला ऐलियन दिसल्याची तक्रार पंतप्रधान कार्यालयात केली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif