IPL Auction 2025 Live

Pune: इंजेक्शन देऊन बायकोची हत्या, पुणे येथील रुग्णालय कर्मचाऱ्याचे कृत्य

पुणे शहरातील पौड रोड पोलीस ठाण्यात (Paud Police Station) या धक्कादायक घटनेबाबत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी स्वप्नील सावंत नामक एका 23 वर्षीय पुरुष नर्सला (Male Nurse) संशयावरुन अटक केली आहे.

Injection | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

रुग्णालयातून जीवघेण्या औषधाची चोरी करुन तेच औषध इंजेक्शनद्वारे पत्नीच्या शरीरात टोचून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे शहरातील पौड रोड पोलीस ठाण्यात (Paud Police Station) या धक्कादायक घटनेबाबत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी स्वप्नील सावंत नामक एका 23 वर्षीय पुरुष नर्सला (Male Nurse) संशयावरुन अटक केली आहे. स्वप्नील सावंत हा एका रुण्गालयात परिचारक म्हणून काम करत होता. त्याचे रुग्णालयातीलच एका महिला परिचारीकेसोबत प्रेमसंबंध जुळले होते. त्यातूनच हे कृत्य घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. स्वप्नील सावंत याने पत्नीची हत्या करुन तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

पौड रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील सावंतचे एका परीचारीकेशी प्रेमसंबंध होते. जी त्याची खासगी रुग्णालयात सहकारी होती आणि तिच्याशी लग्न करण्याचा तो विचार करत होता.

दरम्यान, आरोपी स्वप्नील सावंत याने पीडिता प्रियंका क्षेत्रे हिच्यासोबत विवाह केला होता. नवविवाहीत असलेले हे दाम्पत्य पुणे येथे भाड्याच्या घरात राहात असे. आरोपीने अत्यावस्थ अवस्थेत असलेल्या त्याच्या पत्नीला म्हणजेच प्रियंक हिला 14 नोव्हेंबर रोजी रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. (हेही वाचा, Pune: आठवीत शिकणाऱ्या मुलाला प्रेमाची उबळ, WhatsApp च्या माध्यमातून वर्गातील मुलीला प्रपोज; प्रकरण पोलिसात दाखल)

प्रियंका हिने स्वाक्षरी केलेली कथित सुसाईड नोटही पोलिसांना सापडली आहे. या नोटमध्ये पीडितेवर घरगुती हिंसाचार होत असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी घरगुती हिंसाचार आणि आत्महत्येस प्रवृत्त केले प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुण्यात घडलेल्या या भयावह घटनेची वैद्यकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. रुग्णालयात कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीनेच अशा प्रकारचे कृत्य केल्याने वैद्यकीय वर्तुळातील सुरक्षीतता तसे कौटुंबीक हिंसाचाराच्या घटनांचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आला आहे.

पाठिमागील काही काळापासून केवळ पुणेच नव्हे तर राज्यातील विविध ठिकाणांहून कौटुंबीक छळाच्या घटना पुढे येत आहेत. खास करुन कोरोना काळानंतर या घटनांमध्ये विशेष वाढ झाल्याचे अभ्यासक सांगतात. कोरोनापूर्वीही अशा घनटांचे प्रमाण कमी नव्हते. मात्र कोरोनानंतर ते अधिक वाढल्याचे सांगितले जात आहे.