Pune Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

Pune Weather Prediction, July 21: पुण्यात आज दिवसभर ढगाळ वतावरणास वीजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे.हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. काही भागात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे.आजही हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर पुणे आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. व पुण्यात घाट माथ्यावर आज ही मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आज अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे व येणाऱ्या काही दिवसात राज्यात पाऊसचा जोर वाडण्याची शक्यता आहे. आता पुण्यात उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने पुण्यात उद्याचे हवामान याचा अंदाज लावला आहे. हेही वाचा: Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

पुण्यात  उद्याचे हवामान कसे?

भारतीय हवामान विभाग (IMD) ने शनिवारी (20 जुलै) महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्याच्या काही भागांसाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. या प्रदेशांमध्ये मुसळधार ते अत्यंत मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा हवामान अंदाज (Weather Forecast) वर्तविण्यात आला आहे. गुजरात आणि भारताच्या दक्षिण भागात रविवारपर्यंत जोरदार पाऊस कायम राहू शकतो.विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये येत्या २४ ते ४८ तासांत गडगडाटी वादळ, विजांचा कडकडाट आणि मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे आणि लोकांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.