Mumbai Weather Prediction, July 21 : मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत काल पासून पावसाने दमदार हजेरी लावायला सुरवात केली आहे. आज सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे काही ठिकाणी रस्त्यावर पानी साचल्याने वहातूक कोंडी देखील निर्माण झाली आहे. पुढच्या 24 तासात मुंबई शहरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आज मुंबईत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 29 अंश सेल्सिअस ते 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. पावसाचा फटका लोकल सेवेला देखील बसला आहे. सध्या तिन्ही मार्गावरील रेल्वेसेवा धीम्या गतीने सुरू आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) शनिवारी आपल्या मुंबई हवामान अपडेटमध्ये सांगितले की, 4.24 मीटर उंचीची भरती सकाळी 11.28 वाजता शहराच्या किनारपट्टीला धडकेल आणि आणखी 12 तासांनंतर रात्री 11.18 वाजता आणखी एक भरती येईल आणि ती 3.66 मीटर उंच अपेक्षित आहे.बीएमसीच्या मुंबई हवामान अहवालानुसार, शहरात शुक्रवारी रात्री ८ ते शनिवारी सकाळी ६ या वेळेत सरासरी ६६ मिमी पाऊस पडला, तर पश्चिम उपनगरात ५७ मिमी आणि पूर्व उपनगरात ५३ मिमी पाऊस झाला. मुंबईत उद्या पण पावसाचा जोर असाच कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने मुंबईत उद्याचे हवामान कसे ह्याच अंदाज लावला आहे. हेही वाचा: Mumbai Weather Forecast Today: मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा हवमान विभागाचा अंदाज

मुंबईत उद्याचे हवामान कसे?

पुढील दोन दिवसांत कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि यानाम या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाजही आयएमडीने वर्तवला आहे. IMD च्या शनिवारच्या दैनंदिन हवामान बुलेटिननुसार, उडुपी आणि उत्तर कन्नडसाठी रेड अलर्टची सूचना देत मुसळधार पाऊस कर्नाटकला धडकणार आहे. हवामान विभागाने 20 जुलै रोजी उत्तरा कन्नड, शिमोगा, उडुपी आणि चिकमंगळूर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.