Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्याचे उद्याचे वातावरण कसे असेल? जाणून घ्या हवामान अंदाज !
या पाण्यात अनेक गाड्या अडकल्या होत्या त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला होता.आजही पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाने सांगितलं आहे.
Pune Weather Forecast For June 7: महाराष्ट्रामध्ये आज मान्सून दाखल झाला असल्याची आनंद वार्ता काही वेळापूर्वीच वेधशाळेने दिली आहे. सध्या राज्यात पाऊस रत्नागिरी, सोलापूर आणि पुढे मेडक, भद्राचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचला आहे. पुढील २४ तासांत दक्षिण कोकणातील काही भाग, घाट परिसर आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. पुण्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आजही पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाने सांगितलं आहे.आता नेमकी पुढे पावसाची स्थिति काय असेल हे जाणून घेण्यासाठी हवामान विभागाने पुणे शहरात उद्याचे हवामान काय असेल याचा पहा काय आहे अंदाज!हेही वाचा : Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रातील हवामान अंदाज, मुसळधार पाऊस, वादळी वारे, काही ठिकाणी तापमान वाढ; घ्या जाणून
पुणे शहराचा उद्याचा हवामान अंदाज काय असेल पहा:
मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)
कोकण : ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी.
मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, कोल्हापूर.
पहिला दमदार मान्सूनपूर्व पाऊस पडताच पुण्यात जनजीवन विस्कळीत झाले होते तसेच अनेक ठिकाणी वीजप्रवाह सुद्धा खंडित झाला आहे . आनेक भागमध्ये पाणी भरल्याच समोर आले आहेत. अवघ्या काही तासातच 114.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे , पुण्यात ह्यावेळी दमदार मान्सूनपूर्व पाऊस बरसला आहे. अनपेक्षितपणे कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पुणे शहराजवळील वडाचीवाडी उपनगर 3 जून 2024 रोजी तासाभराच्या पावसाने पाण्यात बुडाले होते. या पाण्यात अनेक गाड्या अडकल्या होत्या त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला होता.