Pune Weather Forecast For Tomorrow: पूण्याचे उद्याचे हवामान कसे असेल? जाणून घ्या आयएमडीने वर्तवलेला अंदाज
पुढील चार ते पाच दिवस पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात हलका पाऊस पडू शकतो, परंतु मुसळधार पावसाची शक्यता नाही.
पुण्याचे उद्याचे हवामान-IMD च्या रीपोर्ट नुसार पुण्यातल्या मुसळधार पावसाने आता विश्रांती घेतली आहे,आणि सोबतच पुण्यात आता पावसाच्या सरी कमी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. पुढील चार ते पाच दिवस पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात हलका पाऊस पडू शकतो, परंतु मुसळधार पावसाची शक्यता नाही.भारतीय हवामान विभाग (IMD) ने सांगितले की,पुण्यात कमाल तापमान 33-34 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल तर किमान तापमान 23-25 अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल. 18 जूननंतर पावसाचा जोर वाढू शकतो आणि जोरदार मान्सून येण्याची शक्यता आहे. आता उद्या नेमक वातावरण कसं असेल त्यासाठी हवामान विभागाने पुणे शहरात उद्याचे हवामान कस असेल ह्याचा अंदाज लावला आहे.हेही वाचा: Vidharbha Weather Forecast For Tomorrow : विदर्भात उद्याचे हवामान कसे असेल? पहा नागपूर सह आजुबाजूच्या भागातील अंदाज
आयएमडी वेबसाइटनुसार, पुणे आणि त्याच्या आसपासच्या भागात जसे कोरेगाव, मगरपट्टा, एनडीए, चिंचवड, लोहेगाव आणि लव्हाळे या भागात ढगाळ आकाश असेल दुपार आणि संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण असेल, एक किंवा दोन हलक्या सरी पडतील.