Pune Weather Forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!

हवामान खात्याने आज पुणे शहरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सोबतच आज पुण्यात घाट माथ्यावर अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने आज पुण्यात घाट माथ्यावर रेड अलर्ट जारी केला आहे.

Pune Weather Prediction, August 03: पुण्यात आज IMD च्या अंदाजानुसार मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने आज पुणे शहरात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सोबतच आज पुण्यात घाट माथ्यावर अती मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने आज पुण्यात घाट माथ्यावर रेड अलर्ट जारी केला आहे.IMD ने अंदाज वर्तवला आहे की शुक्रवारपासून पावसाचा वेग वाढणार आहे आणि पुढील काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे.जिल्ह्यात गेले काही दिवसा आधी मुसळधार पावसाने (Pune Rain) थैमान घातले होता.आणि या मुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली होती. पण मात्र खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आणि यामुळे पुण्यातील बाबा भिडे पूल पाण्या खाली गेला होता.  आता गेले 2 ते 3 दिवसात पुणे शहरात जरी पावसाचा वेग कमी झाला असली तरी पुणे घाट माथ्यावर मात्र पावसाचा जोर कायम आहे. आता पुण्यात उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने पुण्यात उद्याचे हवामान अंदाज लावला आहे. हेही वाचा: Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्याचे उद्याचे हवामान कसे असेल? हवामान विभागाकडून ढगाळ वातावरणाचा अंदाज!

पुण्यात उद्याचे हवामान कसे?

भारतीय हवामान खात्याने (IMD) मध्य महाराष्ट्र, पूर्व मध्य प्रदेशात आज म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी अत्यंत मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. IMD नुसार, हिमाचल प्रदेश, केरळ, उत्तराखंड, कोकण, गोवा, गुजरात, राजस्थान, कर्नाटक, आसाम, मेघालय यासह देशातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.महाराष्ट्रात मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील घाट भागात अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट वर्तवण्यात आला आहे.