Pune Shocker! घरकाम नीट न केल्याने सासूने केली सुनेची निर्घृण हत्या; पुण्यातील धक्कादायक घटना

दोन दिवसांपूर्वी घरातील कामावरून दोघींमध्ये भांडण झाले. यानंतर कमलाने रितूला मारले आणि तिचे डोके जोरात जमिनीवर आपटले.

Representational Image (Photo Credits: Facebook)

सासू-सुनेचे भांडण ही जवळजवळ प्रत्येक घरात सर्वसामान्य गोष्ट आहे. दोघीही एकमेकींवर चिडतात, रागावतात आणि नंतर परत एकत्र येतात. परंतु पुण्यात (Pune) या सासू-सुनेच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एका सुनेच्या निर्घृण हत्येने शहर हादरले आहे. महाराष्ट्र टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यातील विमान नगरमध्ये (Viman Nagar) एका महिलेने आपल्या सुनेचे डोके जमिनीवर ठेचून तिची निर्घृण हत्या केली आहे.

रितू माळवी वाय 28, असे मृत सुनेचे नाव असून, 49 वर्षीय कमला माळवी असे आरोपी सासूचे नाव आहे. विमाननगर पोलिसांनी कमला माळवीला अटक केली आहे.

एफआयआरनुसार, कमला रितूवर घरातील काम नीट करत नसल्याचा आणि मुलाची काळजी घेत नसल्याचा आरोप करत असे. दोन दिवसांपूर्वी घरातील कामावरून दोघींमध्ये भांडण झाले. यानंतर कमलाने रितूला मारले आणि तिचे डोके जोरात जमिनीवर आपटले. तिला रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात मृताच्या डोक्यावर जखम झाल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा: Sex Power Pills: दारू प्यायल्यानंतर घेतल्या Viagra च्या दोन गोळ्या; नागपुरात 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू)

दुसरीकडे, पुण्याला लागून असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये अशोक रामदास जाधव नावाच्या व्यक्तीची त्याच्याच मुलाने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुलाने ही हत्या आत्महत्या असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आश्चर्याची बाब म्हणजे हत्येनंतर त्याची आई म्हणजेच मृताची पत्नी आणि मोठा भाऊ यांनीही पुरावे नष्ट करण्यात त्याला साथ दिली. मयत हा त्याच्या मुलाच्या मैत्रिणीसाठी अर्वाच्य शब्दांचा वापर करत असे आणि शिवीगाळही करत असे. या गोष्टीमुळे आलेल्या रागात त्याने आपल्या वडिलांचा गळा दाबून खून केला.



संबंधित बातम्या