Pune Rape: गुंगीचे औषध देऊन जीम ट्रेनर तरुणीवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना

पीडित तरुणी ही आरोपीला जेवणाचा डब्बा देण्यासाठी आली होती.

Representational Image | Rape (Photo Credits: PTI)

एका जीम ट्रेनर तरूणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना पुण्यातील Pune) खराडी (Kharadi) परिसरात घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या सहकाऱ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही आरोपीला जेवणाचा डब्बा देण्यासाठी आली होती. त्यावेळी आरोपीने शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

दीपक चौगुले असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरूणी आणि आरोपी एकाच जीममध्ये ट्रेनर म्हणून काम करतात. मात्र, तीन दिवसांपूर्वी आरोपीने पीडित तरूणीला कॉल केला. तसेच त्याला भूक लागल्याचे तिला सांगितले. त्यानंतर आरोपीसाठी जेवणाचा डब्बा घेऊन आलेल्या पीडित तरूणीला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नव्हेतर, या घटनेचा व्हिडिओ देखील काढला. तसेच यासंदर्भात बाहेर कुठेही वाच्यता केल्यास हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तिला धमकी दिली. यामुळे पीडित तरुणी घाबरली. परंतु, तिने हा सर्वप्रकार तिच्या मैत्रिणीला सांगितला. त्यावेळी मैत्रिणीने दिलेल्या सल्लानुसार तिने चंदननगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हे देखील वाचा- Pune Shocker: धक्कादायक! पुण्यात मित्राची हत्या करून मृतदेह जाळला; ब्लूटुथच्या मदतीने आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश

दरम्यान, दिवसेंदिवस महिलांवरील होणाऱ्या अत्याराच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, अशाही काही महिला आहेत, ज्या बदनामीच्या भितीने आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराबाबत घाबरत आहेत. परंतु, महिलांनी कोणतीही भिती मनात न ठेवता अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. ज्यामुळे महिलांवर अत्याचार करणाऱ्या लोकांना शिक्षा देण्यास पोलिसांना मदत मिळेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif