Pune Shocker: भीमा नदीत सापडलेले 7 मृतदेह आत्महत्या नव्हे हत्या; भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हत्याकांड

त्यामध्ये 2 पुरूष, 2 महिलांचा समावेश आहे. या शोधकार्यामध्ये 3 लहान मुलांचेही मृतदेह आढळले आहेत.

Pune | Twitter

पुण्यामध्ये भीमा नदीत (Bhima River) एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह आढळल्याने सध्या राज्यभर खळबळ पसरली आहे. सुरूवातीला ही सामुहिक आत्महत्या असल्याचा तर्क लावला जात असला तरी आता पोलिस तपासामध्ये हा प्रकार आत्महत्या नसून एक सुनियोजित कट असल्याचं समोर आले. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरुद्ध कलम 302 अंतर्गत FIR नोंदवण्यात आला आहे. अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिस (Pune Rural Police) यांच्याकडून देण्यात आली आहे.

दरम्यान पोलिसांनी 18 ते 22 जानेवारी दरम्यान 5 दिवसांत पारगाव भागात भीमा नदीतून 4 मृतदेह बाहेर काढले. त्यामध्ये 2 पुरूष, 2 महिलांचा समावेश आहे. या शोधकार्यामध्ये 3 लहान मुलांचेही मृतदेह आढळले आहेत. मृतांची नावं मोहन उत्तम पवार (वय ४५), त्यांची पत्नी संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०, दोघे रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड), जावई शाम पंडित फलवरे (वय २८), मुलगी राणी शाम फलवरे (वय २४ वर्षे), नातू रितेश उर्फ भैय्या शाम फलवरे (वय ७), छोटू शाम फलवरे (वय ५) आणि कृष्णा शाम फलवरे (वय ३, ) अशी आहेत. हे सारे धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील हातोला मधील आहेत. नक्की वाचा: Mass Suicide in Pune? पुणे हादरले, भीमा नदीपात्रात सापडले एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह; पोलिसांचा सामूहिक आत्महत्येचा संशय .

मीडीया रिपोर्ट नुसार मृतांपैकी मोहन पवार यांचा मुलगा अमोल हा 3 महिन्यांपूर्वी चुलत भावासोबत, धनंजय सोबत येत होता. रस्त्यात अपघात झाला आणि धनंजय त्यामध्ये मृत्यूमुखी पडला. अमोल बचावला होता. यामध्ये धनंजयच्या कुटुंबाला त्याची हत्या झाल्याचा संशय होता. मोहन पवार यांच्या कुटुंबाने धनंजय वर करणी करून त्याला ठार मारल्याचा संशय त्यांच्या मनात होता. यामधून धनंजयच्या कुटुंबाने ती गोष्ट मनात ठेवून मोहन पवार आणि त्याच्या कुटुंबाला भीमा नदीवर बोलावलं. सातही जणांना गाडीतून भीमा नदीत फेकलं. ही घटना 17 जानेवारीच्या रात्रीची आहे. 18 जानेवारीपासून मृतदेह सापडण्यास सुरूवात झाली आणि 24 जानेवारी पर्यंत एकूण 7 मृतदेह आढळले.