Pune Shocker: पुण्यात अल्पवयीन मुलीने दारुच्या नशेत लावला गळफास; मैत्रीणही नशेत बेशुद्ध!
पुण्यातील येरवडा परिसरात दोन अल्पवयीन तरुणींच राहत्या घरात दारुपार्टी केली. मद्यप्राशन केल्यावर एका तरुणीने आत्महत्या दुसरी बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.
पुण्यातील (Pune News) येरवडा (Yerwada Crime) परिसरात दोन अल्पवयीन तरुणींच राहत्या घरात दारुपार्टी केली. मद्यप्राशन केल्यावर एका तरुणीने आत्महत्या दुसरी बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. येरवडा भागातील धक्कादायक घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. आत्महत्या केलेल्या मुलीचे वय 16 आहे. येरवडा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत तरुणी 11 वी मध्ये असून येरवडा भागात होती. सोमवारी सायंकाळी ती आणि तिच्या एका मैत्रिणीने आई भाजी आणण्यासाठी गेली असता घरात दारू पार्टी करायचे ठरवले आणि मद्यप्राशन केले होते. (हेही वाचा - Police personnel Commits Suicide: गेल्या 24 तासात राज्यात दोन पोलिसांच्या आत्महत्या; पोलीस प्रशासात खळबळ)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुणीच्या मैत्रिणीने त्याच भागात राहणाऱ्या एका तरुणाला रात्री 8 वाजता बोलावले होते. तो तरुण घरी पोहचताच त्याने एक तरुणी ओढणी वापरून गळफास लावलेल्या अवस्थेत त्याने पाहिले. यानंतर त्यानेच तिच्या आईला बोलवून आणले. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यापुर्वीच तिचा मृत्यू झालेला होता.
मृत तरुणीची दुसरी मैत्रीण बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. तिच्या तोंडावर पाणी मारून उठवले, तेव्हा ती दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले. तिला देखील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दारू पार्टीनंतर त्यांनी उलट्या देखील केल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र या तरुणीने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही.
(The above story first appeared on LatestLY on Jul 16, 2024 06:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

