Pune Rains: अंडा भुर्जीची गाडी वाचवायला गेलेल्या 3 तरूणांचा वीजेचा झटका लागून मृत्यू; डेक्कन परिसरातील पूलाची वाडी येथील घटना
मुठा नदीचे पाणी वाढल्याने आपली अंडाभूर्जीची गाडी वाचवायला गेले असता अनर्थ घडला आणि तीन तरूणांचा वीजेचा झटका लागून मृत्यू झाला आहे.ह
पुण्यात मध्ये तुफान पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहेत. अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांची धांदल उडाली आहे. अशातच रात्री 3 च्या सुमारास मुठा नदी जवळ झेड ब्रीज खाली पाणी साचल्याने 18-25 वर्षातील 3 तरूणांना वीजेचा झटका लागल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुठा नदीचे पाणी वाढल्याने आपली अंडाभूर्जीची गाडी वाचवायला गेले असता अनर्थ घडला आहे. डेक्कन पोलिस स्टेशनचे सिनियर पोलिस इंस्पेक्टर स्वप्नाली जोशी यांनी ही माहिती दिली आहे.
खडकवासला धरण भरल्याने तेथून पाण्याचा विसर्ग सुरू झालाआहे. अशात मुठा नदीला मोठा पुर आला आहे. काल रात्री मोठा पाऊस आल्याने आपला स्टॉल वाचवण्यासाठी 3 जण पुढे गेले. त्यामध्ये वीजेचा झटका लागून तरूणांचा जागीच मृत्यू झाला. या मृतांची नावं अभिषेक अजय घाणेकर (वय २५, रा. पुलाच्या वाडी डेक्कन), आकाश विनायक माने (वय २१, रा. पूलाची वाडी डेक्कन, शिवा जिदबहादुर परिहार (वय १८, नेपाळी कामगार) आहेत. पहाटे रात्री पाणी वाढल्याने आपली गाडी सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी ते तिघेही पुन्हा गाडीवर गेले. गुडघाभर पाण्यातून वाट काढत जात असताना अचानक त्यांना विजेचा शॉक बसला आणि तिघांचा जागीच मृत्यू झाला.
वीज प्रवाह बंद करून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र, तिन्ही तरुणांना डॉक्टरांनी आज रोजी पाहते पाच वाजताच्या दरम्यान मृत घोषित केले आहे.
वीज प्रवाह बंद करून या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना सह्याद्री हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तिन्ही तरुणांना डॉक्टरांनी आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास मृत घोषित केले आहे.