Pune Rains: पुणे शहरात पावसाचा पुन्हा धुमाकूळ; रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे ओढे,नदी पात्राच्या पाण्यात वाढ

अनेकांनी सोशल मीडियामध्ये पावसाचे पाणी साचल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीचे काही फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत.

Pune Rains | Photo Credits: Twitter

पुणे शहराला काल (21 ऑक्टोबर) रात्री पावसाने झोडपल्यानंतर आज पुण्यात अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तुंबई झालेल्या पुण्यातून अनेकांना वाट काढावी लागत आहे. पुणे शहरात सखल भागात पाणी साचल्याने अनेक सोसायटींमध्येही पाणी घुसले आहे. पद्मावतीच्या गुरुराज सोसायटी,  येरवडा, शांतीनगर, घोरपडी गाव, पद्मावती, मार्केट यार्ड परिसरातील अनेक घरांमध्ये शिरले पाणी शिरले पाणी आहे. तर आंबिल ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कात्रज, नवीन वसाहत पाण्याचा प्रवाहामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनेकांनी सोशल मीडियामध्ये पावसाचे पाणी साचल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीचे काही फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत.लोहगाव भागातील सोसायटींमध्ये पावसाचे पाणी घुसले आहे. सखल भागामध्ये सोसयटींमध्ये पाणी घुसल्याने दुचाकी वाहून गेल्या आहेत. तर पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी काम दाखल करण्यात आले आहेत.

पुण्यासोबतच काल रात्री मुंबई शहरामध्येही वीजांच्या कडकडाटासह, मेघगर्जना झाल्या. अशातच तासभर कोसळलेल्या दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. Maharashtra Monsoon Forecast 22nd october: विदर्भासह पुण्यात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता; तर मुंबईत येत्या 24 तासांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार.

पहा मुसळधार पावसानंतर पुणे शहरातील स्थिती

स्वारगेट बस स्थानकातील स्थिती  

पुणे शहरामध्ये पुढील 24-48 तासांमध्ये जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान शाळेकडून वर्तवण्यात आली आहे. एकीकडे सारे दिवाळीची तयारी करत असताना कोसळणारा दमदार पाऊस या सणाच्या उत्साहावर पाणी फिरवणार असल्याची चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif