Pune Rain: पुण्यात मुसळधार पाऊस, गणपती दर्शनासाठी आलेल्या भाविकांची धावपळ
पुणे शहरातील शिवाजीनगर, पेठ परिसर, डेक्कन, कोथरुड, कर्वेनगर, विश्रांतवाडी, कात्रज, बाणेर, पाषाण, कोंढवा, सिंहगड रोड, लोहेगाव, हडपसर या भागात मंगळवारी सायंकाळी सात वाजल्यानंतर जोरदार पाऊस झाला.
पुण्याच्या (Pune) अनेक परिसरात मंगळवारी संध्याकाळी (Pune Weather Update) मुसळधार पाऊस पडला. सायंकाळी सात वाजल्यानंतर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. शिवाजीनगर आणि लोहेगाव या दोन्ही भागात रात्री 8.40 वाजेपर्यंत विजांच्या कडकडाटासह 26 मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारची पहाट उगवताच पावसाने थोडीफार विश्रांती घेतली. त्यामुळे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकर घराबाहेर पडले. सकाळी 11 वाजताच्या सुमारास जोरदार पावसाने पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे पुण्यात गणेश दर्शनासाठी (Ganesh Darshan 2023) आलेल्या भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. ढगांच्या गडगडाटासह सुरू झालेल्या या पावसामुळे शहरातील काही भागातील रस्त्यावर पाणी साचलं होतं. (हेही वाचा - Weather Forecast: कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात गडगडाटी पाऊस, जाणून घ्या हवामानाचा अंदाज)
पुणे शहरातील शिवाजीनगर, पेठ परिसर, डेक्कन, कोथरुड, कर्वेनगर, विश्रांतवाडी, कात्रज, बाणेर, पाषाण, कोंढवा, सिंहगड रोड, लोहेगाव, हडपसर या भागात मंगळवारी सायंकाळी सात वाजल्यानंतर जोरदार पाऊस झाला. शिवाजीनगर आणि लोहेगाव या दोन्ही भागात रात्री 8.40 वाजेपर्यंत 26 मिमी पावसाची नोंद झाली. सध्या पुणे शहरासह मध्यवर्ती भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. हवामान खात्याने पुणे, मुंबईसह कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.