Pune Shocker: सावकाराचा महिलेवर पतीसमोरच बलात्कार, पुणे हादरलं

महिलेवर सावकाराने पतीसमोर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरातील हडपसर येथे घडली आहे. खासगी सावकारी आणि सावकारांचे अत्याचार चिंतेचा विषय ठरतो आहे.

Pune Shocker: सावकाराचा  महिलेवर पतीसमोरच बलात्कार, पुणे हादरलं
Stop Rape (Representative image)

Moneylender Abuse in Pune: कोणत्याही संवेदनशील व्यक्तीच्या तळपायाची आग मस्तकाला जाईल अशा घटना पुणे येथे घडली आहे. कर्जापोटी उसने घेतलेले पैसे वेळत परत न दिल्याने खासगी सावकाराने एका महिलेवर तिच्या पतीसमोरच बलात्कार केला आहे. सावकाराची विकृती इतक्यावरच थांबली नाही. त्याने या कृत्याचा व्हिडिओ चित्रित करुन तो सोशल मीडियावर व्हायरल केला. पुणे शहरातील हडपसर (Hadapsar) परिसरात फेब्रुवारी 2023 मध्ये घडली. पीडिते (वय 34 वर्षे) दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी इम्तियाज हसीन शेख (वय 47 वर्षे) याला अटक केली आहे.

पीडितेच्या पतीला आरोपी सावकाराने काही पैसे उसणे दिले होते. दिलेल्या मुदतीत हे पैसे पीडितेच्या पतीला परत करता आले नाहीत. आरोपीने पैशांसाठी तगादा लावला होता. तगादा लावूनही हे पैसे परत करता आले नाहीत. त्यामुळे आरोपीने पीडितेला तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन हडपसर येथील म्हाडा कॉलनी येथे पतीसह बोलावून घेतले. पीडिता आणि पती म्हाडा कॉलनी येथे पोहोचल्यावर आरोपीने पीडितेच्या पतीला चाकूचा धाक दाखवून पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याच्यासमोरच पीडितेवर जबरस्तीने शारीरिक संबंध प्रस्तापीत केले.

आरोपीची विकृती इतकी की, पीडितेवर बलात्कार करताना त्याने या घटनेचा व्हिडिओ तयार केला. तो इतकेच करुन थांबला नाही. त्याने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला वारंवार ब्लॅकमेल केले. तिच्याकडे शरीरसंबंधांची मागणी केली आणि वेळोवेळी बलात्कार केला. सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने आरपीला नकार दिला. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ खोरखरच सोशल मीडियावर व्हायरल केला. अखेर पीडितेने हडपसर पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदीवली. प्राप्त तक्रारीवरुन पोलिसांनी आरपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पाठिमागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्हा गुन्हेगारीच्या बाबतीत जोरदार चर्चेत आहे. कधी कोयता गँगची दहशत. कधी महिलांवरील हल्ले, कधी पार्किंगमधील वाहनांची स्थानिग गावगुंडांकडून होणारी तोडफोड, अशा एक ना अनेक कारणांनी पुणे चर्चेत आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे हे आता गुन्हेगारीसाठीही ओळखले जाऊ लागले आहे. त्यामुले समाजातून चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 26, 2023 01:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).