Pune Porsche Car Case: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये आमदाराच्या 2 कार्यकर्त्यांना अटक
पुणे पोलिस गुन्हे शाखेने आमदाराच्या दोन कार्यकर्त्यांना मुंबई मधून अटक केली आहे.
पुणे पोर्शे कार अपघातानंतर (Pune Porsche Car Case) आरोपी मुलाच्या कुटुंबाने त्याला वाचवण्यासाठी केलेली अनेक कृष्णकृत्य आता समोर आली आहे. यामध्ये आरोपीचे ब्लड सॅम्पल देखील बदलले गेल्याचं समोर आले आहे. त्याप्रकरणी ससून हॉस्पिटलच्या (Sassoon Hospital) पुणे पोलिस गुन्हे शाखेने या दोघांना मुंबई मधून अटक केली. पुणे पोलिस गुन्हे शाखेने या दोघांना मुंबई मधून अटक केली. दोन डॉक्टरांना अटक करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणी एका आमदाराच्या दोन कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड अशी त्यांची नावं असून 10 जून पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान अश्पाक मकानदार हा एका आमदाराचा कार्यकर्ता आहे. अपघातानंतर तो पोलिस स्टेशन मध्येही आला होता. आमदाराच्या निकटवर्तीय कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. मकानदारचे अपघातापासून चर्चेत होता. पोलिसांनी त्याच्यावर सुरूवातीला कोणतीच कारवाई केली नव्हती. मात्र काल पोलिसांनी आमदाराच्या कार्यकर्त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले आहे.
पुणे टाईम्स मिरर च्या माहितीनुसार, पुणे पोलिस गुन्हे शाखेने या दोघांना मुंबई मधून अटक केली. रक्ताचे रिपोर्ट बदलल्या प्रकरणी 3 लाखाचा आर्थिक व्यवहार झाला त्यामध्ये या दोघांना अटक झाली आहे.
अल्पवयीन आरोपीची बाल सुधार गृहातील कोठडी आजपर्यंत आहे. मात्र त्याच्या कोठडीत वाढ करून मागण्यात येणार आहे. पुणे पोलीस बाल न्याय मंडळासमोर पोलीस अल्पवयीन आरोपीची कस्टडी वाढवून मागणार आहे.