Pune Police Viral Video: टी-20 विश्वचषकात भारताच्या विजयानंतर पुणेकर रस्त्यावर; गर्दी आवरताना पोलिसांकडून दुचाकीस्वारांना बंदुकीने माराहाण, व्हिडीओ व्हायरल (Watch Video)

या विजयाचा जल्लोष साजरा करताना पुणेकरही रस्त्यावर उतरले. त्यांना आवरताना पोलिसांनी अखेर बलाचा वापर केला. त्याचाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Pune Police Viral Video: नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात (T20 World Cup)भारतीय क्रिकेट संघाने विजय मिळवला. भारतीय संघाने दुसऱ्यांदा विश्वचषक आपल्या नावे केला. या विजयाचा जल्लोष संपूर्ण देशात साजरी केला गेला. यात पुणेही मागे नव्हते. नागरिकांनी रस्त्यावर उतरत मोठा जल्लोष केला. त्यांना आवरताना मात्र, पोलिसांची चांगलीच दमछाक(Pune Police) झाली. शहराची शांतता भंग होऊ नये यासाठी पोलिसांनी अखेर बलाचा वापर करण्यास सुरूवात केली. त्याचाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये वाहतूक नियोजन करणारा पोलीस नागरिकांना बंदुकीने मारहाण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका एक्स वापरकर्त्याने या प्रकारावर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. (हेही वाचा: Children Swept Into Bhushi Dam Update: भुशी धरणामागील धबधब्यात वाहुन गेलेल्या 5 जणांचा व्हिडिओ व्हायरल; पहा काळजाचा ठोका चुकवणारा क्षण)

दरम्यान, सण-उत्सव असो की काही राजकीय कार्यक्रम पोलीस प्रशासन नेहमी कर्तव्य बजावत असते. मात्र, काही वेळा विनाकारण नागरिकांकडून रस्स्त्यावर दंगा घालण्यचा प्रयत्न होतो. त्यांना आवरताना पोलिसांच्या नाकेनऊ येतात. तेव्हा नाइलाजास्तव पोलीसांनाही त्यांच्या खाकीचा रौब दाखवावा लागतो. त्यावर काहींनी संताप व्यक्त केला आहे.