Pune: राजकीय नेत्यांचे फोटो टॅम्परींग केल्याप्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई, रांची येथून एकाला अटक

भाजपच्या एका खासदाराने निगडी पोलीस ठाण्यात पिंपरी-चिंचवड, पुणे येथे एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

Arrested | (File Image)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यासह प्रसिद्ध व्यक्तींच्या फोटोंशी टॅम्परींग (Tampering Photos) केल्याप्रकरणी आणि सोशल मीडियावर (Social Media) आक्षेपार्ह व्हिडिओ बनवण्यासाठी त्या फोटोंचा वापर केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी झारखंडच्या रांची येथून एका व्यक्तीला अटक केली आहे. शमीम जावेद अन्सारी (20) असे आरोपीचे नाव आहे. भाजपच्या एका खासदाराने निगडी पोलीस ठाण्यात पिंपरी-चिंचवड, पुणे (Pune) येथे एफआयआर (FIR) नोंदवल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. (Pune: प्रेमवीर रुसला, नगरसेवकांना धमक्या देत सुटला; प्रेयसीने नकार दिल्याने कृत्य; पुणे पोलिसांनी आवळ्या मुसक्या, घ्या जाणून)

एफआयआरनुसार अन्सारीने फोटो एडिट केले आणि छेडछाड केली. आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करण्यासाठी त्याने त्या फोटोचा वापर केला. व्हीव्हीआयपींच्या फोटोंवर वैयक्तिक कमेंट करतानाही तो सापडला.रांचीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसपी), कौशल किशोर यांनी आरोपीला न्यायालयात नेण्यात आल्याची पुष्टी केली आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला ट्रान्झिट रिमांडवर महाराष्ट्रात नेले.

आरोपीवर आयपीसीच्या कलम 295A, 505(1)/153(4) आणि IT कायद्याच्या 67/67(A) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.