Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा! दर गुरुवारी शहराचा जलपुरवठा राहणार बंद; नेमका कधीपासून? जाणून घ्या तारीख

कारण, लवकरच आपल्यावर पाणीकपातीचे संकट ओढावणार आहे. होय, ही पाणीकपात येत्या गुरुवारपासून म्हणजेच 18 मे पासून लागू होणार आहे. त्यामुळे दर आठवड्यातून एक दिवस (गुरुवार) पाणी कपात निश्चित करण्यात आली आहे.

Water Cut | Image Used For representational Purpose | Pixabay.com

Pmc Water Supply News: पुणेकरांनो सावधान! तुम्हाला पाणी फारच काटकसरीने वापरावे लागणार आहे. कारण, लवकरच आपल्यावर पाणीकपातीचे संकट ओढावणार आहे. होय, ही पाणीकपात येत्या गुरुवारपासून म्हणजेच 18 मे पासून लागू होणार आहे. त्यामुळे दर आठवड्यातून एक दिवस (गुरुवार) पाणी कपात निश्चित करण्यात आली आहे. पुणे महापालिकेचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे प्रसारमाध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. हवामान अभ्यासकांकडून या आधीच संकेत देण्यात आले आहेत की, यंदा अल निनोचे संकट ओढावू शकते. त्यामुळे त्याचा परिणाम पावसावर होऊन पर्जन्यमान काहीसे कमी होणार आहे. त्यामुळे सर्वच नागरिकांना पाण्याचे नियोजन अगदीच जपून करावे लागणार आहे.

जलव्यवस्थापनाचे जाणकार आणि हवामान अभ्यासक सांगतात की, यंदा जर पर्जन्यवृष्टी चांगली राहिली तर चिंताच मिटली. पण, यंदा पाऊसकाळ अपेक्षीत झाला नाही. तर मात्र कठीण आहे. तुम्हाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. परिणामी खबरदारीचा उपाय म्हणून आगोदरपासूनच पुणे शहरात 18 मे पासून प्रत्येक गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे. (हेही वाचा, Pune Water Cut: पाणीकपात टळली; पुणेकरांनी सोडला सुटकेचा निश्वास; पुढचा निर्णय 15 मे नंतर)

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा

पाणी कपात एक दिवस केली तर दुसऱ्या दिवशी शहरवासीयांना कमी दाबाने पाणी मिळण्याची समस्या सतावते. मात्र, आता तसे होणार नाही. पुण्यात साधारण 20 ठिकाणी एअर वॉल्व बसवले आहेत. त्यामुळे पुणेकरांना पुरेशा प्रमाणात दाबाने पाणी पुरवठा होऊ शकतो. दरम्यान, पाणीटंचाई जाणवल्यास नागरिकांना आजूबाजूच्या गावातून टँकर आणता येणार आहेत. तसेच, टँग बंदही ठेवता येणार आहेत. पुणेकरांसाठी मुळशी धरणातून 5 टीएमसी पाण्याची मागणी केली होती. त्याबाबत पाठपुरावा सुरु असल्याचे समजते.