Pune-Mumbai Railway: पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतुक विस्कळीत, रेल्वे प्रशासनाकडून तब्बल १५ गाड्या रद्द

आज आणि उद्या रेल्वे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.तरी रेल्वे प्रशासनाकडून तब्बल १५ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Representational Image (Photo Credits: PTI)

तुम्ही पुणे-मुंबई (Pune Mumbai) मार्गावर रेल्वे मार्गाने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली आहे. तरी रेल्वे प्रशासनाकडून तब्बल १५ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कारण मध्य रेल्वेकडून तब्बल २७ तासांचा मेगाब्ल़ॉक घेण्यात आला आहे. आज आणि उद्या रेल्वे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेत प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.  पुणे स्थानकावर अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रवाशांना गरज भासल्यास पुणे स्थानकातून जादा एसटी बसेसची व्यवस्था करण्याचंही नियोजन करण्यात आलं आहे. तरी पुणे- मुंबई दरम्यान रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. रेल्वेच्या या खोळंब्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना विशेष सुचना देण्यात आल्या आहेत.

 

शनिवारी पुणे - मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस (12128) आणि कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस (17412) या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर रविवारी धावणाऱ्या मुंबई - पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस (12127), मुंबई- पुणे डेक्कन एक्स्प्रेस (11007), मुंबई - पुणे सिंहगड एक्स्प्रेस (11009), मुंबई - पुणे प्रगती एक्स्प्रेस (12125), मुंबई - पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस (12123), मुंबई - कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस (17411), पुणे- मुंबई सिंहगड एक्स्प्रेस (11010), पुणे - मुंबई डेक्कन क्वीन (12124), पुणे- मुंबई प्रगती एक्स्प्रेस (12126), पुणे - मुंबई डेक्कन एक्स्प्रेस (11008), पुणे - मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस (12128) धावणार नाही. तसेच सोमवारी मुंबई - पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस (12127) वगळता सगळ्या गाड्या वेळच्या वेळी धावतील अशी माहिती मध्य रेल्वे कडून देण्यात आली आहे. (हे ही वाचा:- Mumbai 27 Hours Power Block: मुंबईतील ब्रिटीशकालीन Carnac Bridge होणार इतिहासजमा, मध्य रेल्वे पाडकामासाठी घेणार 27 तासांचा विशेष मेगा ब्लॉक)

 

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे स्थानकांवर योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांनी मागणी केल्यास त्यांना एसटीने मुंबईला पाठवण्याचे नियोजनही रेल्वेने केले आहे. तरी सोयिस्कर प्रवासासाठी १९ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान रेल्वे प्रवास टाळणं सर्वोत्तम मार्ग आहे. तरी या मार्गावर प्रवास करणार असणाऱ्या प्रवाशांनी संबंधीत बाबीची नोंद घ्यावी अशी सुचना रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif