Pune MHADA Housing Lottery Draw Date: पुणे म्हाडा 4,462 घरांची लॉटरी आता 26 नोव्हेंबरला; पहा वेळापत्रक
ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने सोडतीचे संपूर्ण वेळापत्रक बदलण्यात आले आहे. आधी ही सोडत 13 ऑक्टोबर रोजी होणार होती. पण नवी तारीख 26 नोव्हेंबर आहे.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (MHADA Pune) 4,462 सदनिकांच्या सोडतीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही सोडत 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने सोडतीचे संपूर्ण वेळापत्रक बदलण्यात आले आहे. आधी ही सोडत 13 ऑक्टोबर रोजी होणार होती. नक्की वाचा: MHADA Pune Lottery 2026 Registration: म्हाडा पुणे लॉटरी नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी; अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया .
अर्जाची मुदत का वाढवली?
पुणे मंडळाने 24 ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज प्रक्रिया सुरू केली होती. सुरुवातीला अर्जासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक अर्जदारांना कागदपत्रांच्या ऑनलाइन पडताळणीत अडचणी येत असल्याने ही मुदत एका महिन्याने वाढवण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळामुळेही अर्जदारांची गैरसोय झाल्याचे सांगितले जात आहे.
अर्जदारांना आर्थिक वर्ष 2024-25 किंवा 2025-26 यापैकी कोणत्याही एका वर्षाचा उत्पन्न दाखला अथवा प्राप्तिकर विवरणपत्र सादर करण्याची मुभा यापूर्वीच देण्यात आली आहे.
पुणे विभाग घरांची लॉटरी सुधारित वेळापत्रक
- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत: 15 ऑक्टोबर, सायंकाळी 5 वाजेपर्यंत
- ऑनलाइन अनामत रक्कम भरण्याची मुदत: 15 ऑक्टोबर, रात्री 11.59 वाजेपर्यंत
- आरटीजीएस/एनईएफटीद्वारे रक्कम भरण्याची मुदत: 16 ऑक्टोबर, दुपारी 3 वाजेपर्यंत
- स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी: 12 नोव्हेंबर, सायंकाळी 7 वाजता
- दावे-हरकती नोंदवण्याची मुदत: 14 नोव्हेंबर, सायंकाळी 5 वाजेपर्यंत
- स्वीकृत अर्जांची अंतिम यादी: 20 नोव्हेंबर, सायंकाळी 7 वाजता
- सदनिकांची सोडत: 26 नोव्हेंबर, सकाळी 11 वाजता
- विजेत्या अर्जदारांची नावे प्रसिद्ध होण्याची वेळ: 26 नोव्हेंबर, सायंकाळी 6 वाजता, संकेतस्थळावर
कोणत्या योजनांतील घरे?
पुण्यातील घरांच्या सोडतीत 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील सदनिकांचा समावेश आहे. यात पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रातील घरे आहेत. नक्की वाचा: MHADA Pune Lottery 2026: म्हाडा पुणे लॉटरीत यंदा सर्वात महागडे, 65 लाखांचे घर तथवडे मध्ये; पहा त्याचे सारे अपडेट्स .
अर्जदारांसाठी काय महत्त्वाचे?
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने म्हाडाच्या गृहनिर्माण पोर्टल किंवा मोबाइल अॅपद्वारे पूर्ण करावी लागते. कागदपत्रांचा संच उत्पन्न गट आणि आरक्षण प्रवर्गानुसार वेगळा असतो. त्यामुळे अर्जदारांनी 2026 ची जाहिरात आणि माहितीपुस्तिका पाहूनच कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे. मुदतीच्या शेवटच्या दिवसांची वाट न पाहता अर्ज आणि अनामत रक्कम वेळेत भरावी, असे आवाहन केले जाते.
(The above story first appeared on LatestLY on Sep 20, 2026 04:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

